विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याची मुंबईची ही चौथी वेळ

0
slider_4552

दिल्ली :

मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश संघात २०२१ सालच्या विजय हजारे ट्रॉफी या वनडे स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (१४ मार्च) रंगला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबईने ६ विकेट्सने विजय मिळवत जेतेपदाचा मान मिळवला. विजय हजारे ट्रॉफी जिंकण्याची मुंबईची ही चौथी वेळ आहे.

मुंबईने यापूर्वी २०१८, २००६-०७ आणि २००३-०४ या हंगामात विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले होते. २००२ पासून सुरु झालेल्या विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद आत्तापर्यंत ४ किंवा त्यापेक्षा अधिकवेळा जिंकण्याची कामगिरी मुंबईशिवाय कर्नाटक आणि तमिळनाडू संघालाच करता आली आहे.

रविवारी पार पडलेल्या अंतिम सामन्यात उत्तरप्रदेशने प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ३१२ धावा करत मुंबईला ३१३ धावांचे आव्हान दिले होते.उत्तर प्रदेशकडून माधव कौशिकने नाबाद १५८ धावांची खेळी केली होती. तसेच समर्थ सिगं आणि अक्षदिप नाथ यांनी प्रत्येकी ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. मुंबईकडून तनुष कोटीयनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईकडून आदित्य तरेने नाबाद ११८ धावांची शतकी खेळी केली. तसेच कर्णदार पृथ्वी शॉने ७३ धावांची खेळी केली. याशिवाय शिवम दुबेने ४२ आणि शम्स मुलानीने ३६ धावांची छोटेखानी खेळी करत योगदान दिले. त्यामुळे मुंबईने ४ विकेट्सच्या मोबदल्यात ३१३ धावांचे आव्हान ४१.३ षटकात सहज पार केले आणि सामना जिंकत विजेतेपद आपल्या नावावर केले.

विजय हजारे ट्रॉफीचे आत्तापर्यंतचे विजेते आणि उपविजेते –

२००२-०३ – विजेते – तमिळनाडू, उपविजेते – पंजाब

२००३-०४ – विजेते – मुंबई, उपविजेते – बंगाल

२००४-०५ – विजेते – तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश (संयुक्त)

२००५-०६ – विजेते – रेल्वे, उपविजेते – उत्तरप्रदेश

२००६-०७ – विजेते – मुंबई, उपविजेते – राजस्थान

२००७-०८ – विजेते – सौराष्ट्र, उपविजेते – बंगाल

२००८-०९ – विजेते – तमिळनाडू, उपविजेते – बंगाल

२००९-१० – विजेते – तमिळनाडू, उपविजेते – बंगाल

See also  ऑलिम्पिक इतिहासामध्ये पहिल्यांदा भारतीय महिला हॉकी टीम सेमी फायनलमध्ये

२०१०-११ – विजेते – झारखंड, उपविजेते – गुजराज

२०११-१२ – विजेते – बंगाल, उपविजेते – मुंबई

२०१२-१३ – विजेते – दिल्ली, उपविजेते – आसाम

२०१३-१४ – विजेते – कर्नाटक, उपविजेते – रेल्वे

२०१४-१५ – विजेते – कर्नाटक, उपविजेते – पंजाब

२०१५-१६ – विजेते – गुजरात, उपविजेते – दिल्ली

२०१६-१७ – विजेते – तमिळनाडू, उपविजेते – बंगाल

२०१७-१८ – विजेते – कर्नाटक, उपविजेते – सौराष्ट्र

२०१८ – विजेते – मुंबई, उपविजेते – दिल्ली

२०१९ – विजेते – कर्नाटक, उपविजेते – तमिळनाडू

२०२१ – विजेते – मुंबई, उपविजेते – उत्तरप्रदेश