योगी पार्क चौकात रस्ता रुंदीकरण करून बसवण्यात आले हायमास्ट दिवे.

0
slider_4552

बाणेर :

योगी पार्क सोसायटी चौक येथे हाय मास्ट दिव्याचे अनावरण नगरसेवक बाबूराव चांदेरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. याप्रसंगी योगी पार्क सोसायटी, वेस्ट विंग सोसायटी, पिओनी सोसायटी, ग्रिन्स स्क्वेअर सोसायटी, पेरिविंकल सोसायटी, सिंड्रेला सोसायटी, सिल्व्हर डेल सोसायटी मधील नागरिक आवर्जून उपस्थित होते.

सदर भागामध्ये सुस खिंडीतील पुलाचे काम चालू असल्याने सुसगाव कडे जाणारी वाहतुक ननावरे पुलाकडून वळवली आहे. तसेच बाणेर बालेवाडी कडून पाषाण व सुसगावकडे जाणारी वाहतूक सर्विस रोडणे ननावरे पुला जवळ येत असल्याने येथे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. येथे रस्ता रुंदीकरण करण्यात आला तसेच रात्रीच्या वेळी इथे असणारा अंधार दूर करण्यासाठी हायमास्ट दिवा लावण्यात आला. यासाठी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी प्रयत्न करून कमी वेळामध्ये हा चौक सुसज्ज करून हायमास्ट दिवे चे अनावरण केले.

याप्रसंगी बाबुराव चांदेरे यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, ननावरे ब्रिज जवळ अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या, त्याची दखल घेऊन या ब्रिज जवळ सर्विस रस्ता रुंद करून येथे आवश्यक असणारा प्रकाश देखील उपलब्ध करून दिला आहे. नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने दूर करण्याचे लक्ष समोर ठेवून काम करणे हेच कर्तव्य समजून विकास कामांना हातभार लावत असल्याचे चांदेरे यांनी सांगितले.

See also  शिवसेनेचे डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने दिवाळीनिमित्त गोरगरिबांना सरंजाम वाटप...!