औंध :
सध्या करोनामुळे परिस्थिती अगदी भयानक होत चालली आहे. करोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता सर्व नागरिकांना लसीकरण करण्याची गरज आहे. सुतारवाडी परीसरात लसीकरण केंद्र नसल्याने नागरीकांना लसीकरण करण्यास दूर जावे लागत होते. नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लसीकरण केंद्र जवळ असणे गरजेचे आहे.
म्हणून युवासेना शिवसेना यांच्या वतीने सुतारवाडी भागात पालिकेच्या शाळेत कोविड लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरु करण्यासाठी निवेदन महापालिका सहाय्यक आयुक्त संजीव वावरे साहेब यांना देण्यात आले. त्यावेळी युवा सेना उपविभाग अधिकारी अमित रणपिसे, शहर प्रमुख गजानन थरकुडे, उप शहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, विधानसभा संघटक संजय निम्हण, संतोष तोंडे (विभागप्रमुख ) दिनेश नाथ ऋषिकेश कुलकर्णी रोहित कदम उपस्थित होते.