रतन टाटा यांना व्यवसाय आयडॉल मानणाऱ्या माजी आमदार विनायक निम्हण यांनी, सूसगाव येथील सनीज वर्ल्ड रिसॉर्ट मध्ये शासनाने जम्बो कोविड सेंटर सुरु करण्याच्या दिल्या सूचना.

0
slider_4552

पुणे :

समाजातील बांधिलकी जपता ज्या पद्धतीने व्यवसायिक रतन टाटा यांनी देशाला मदत दिली त्यांना व्यवसायात आयडॉल मानणारे माजी आमदार विनायक निम्हण यांनी पुणेकरांसाठी आपले रिसॉर्ट उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. रतन टाटा माझे आयडॉल आहे !-मा.आमदार विनायक निम्हण यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा सनीज् वर्ल्ड ला आले होते तेव्हा सांगितले होते. राजकारणात जशे बाळासाहेब आमचे आयडॉल आहेत तसेच व्यवसायात रतन टाटा हे आमचे आयडॉल आहेत.

या वरून एक गोष्ट लक्षात येते, आवडत्या व्यक्तीचा फोटो भिंतीवर लावणे आणि आयडॉल म्हणून सांगणे सोपे आहे. पण त्यांचे गुण आचरणात आणणे हे फक्त तो दृष्टीकोन असणारी व्यक्तीच आणू शकते तो दुष्टीकोन माजी आमदार विनायक निम्हण आणि माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी सनीज् वर्ल्ड ह्या भव्य रिसॉर्ट मधे पुणेकरांसाठी जम्बो कॉविड सेंटर सुरु करायची जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना विनंती करून दाखवून दिला आहे.

दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे शहरात कोरोनाची दुसरी लाट उग्र रूप धारण करत आहे. दिवसेंदवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. वाढत्या पेशंट चे प्रमाण इतके मोठया प्रमाणात आहे की, कोरोना झालेल्या नागरीकांना बेड कमी पडत आहे. राज्यशासन पुणे महापालिका यांनी सूरू केलेल्या सरकारी व खासगी हॉस्पिटलध्ये रुग्णांना दाखल करूनही वाढत्या कोरोना बाधितांना उपचार घेता येत नाही. असंख्य रुग्णांना बेड मिळत नाही म्हणून त्रस्त आहे.

अनेकांना कोरोनाची प्राथमिक लागण झाल्यानंतर त्यांना छोट्या घरामुळे स्वतंत्र होम आयसोलेशन करता येत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रसार या घरांमध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सामजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने माजी आमदार विनायक निम्हण ( अध्यक्ष सनीज वर्ल्ड रिसॉर्ट) यांनी त्यांच्या सूसगाव येथील सनीज वर्ल्ड रिसॉर्ट येथे शासनाने जम्बो कोविड सेंटर सूरु करावे, अशी सूचना जिल्हा प्रशासनाला केली. याठिकाणी पंचतारांकित सुविधा आहेत. येथील रुग्णांना चहा, नाष्टा, जेवण मोफत देण्याची व्यवस्था आम्ही करतो. सामाजिक भावनेतून रिसॉर्ट आम्ही कोविडसाठी वापरण्याकरिता देण्यास तयार असल्याचे निम्हण यांनी सांगितले.

See also  बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ९ च्या वतीने दिवाळी सरंजाम वितरण समारंभ संपन्न

तसे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना देण्यात आले आहे. त्या निवेदनात माजी आमदार विनायक निम्हण यांनी नमूद केले आहे की, पुणे शहरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहे. बेडची कमतरता जाणवत आहे. पुणे शहर दाटीवाटीचा भाग आहे. छोटी घरे आहेत. कोरोना पॉझिटिव्ह पण लक्षणे नाहीत अशा अनेक रुग्णांना होम आयसोलेशन करता येत नाही. त्यांच्यामुळे घरातील सर्वांना कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यास बेड अडखून राहतात. या पार्श्वभूमीवर पुण्यातील सूसगाव येथील सनीज् वर्ल्ड रिसॉर्ट येथे कोरोना रुग्णांसाठी जम्बो कोविड केअर सेंटर सुरू करण्याची आमची इच्छा आहे. सनीज वर्ल्ड मध्ये 18000 स्क्वेअर फुटचे दोन प्रशस्त हॉल, अनेक रूम्स / कॉटेजेस आहेत.पाणी, वीज, पंखे, संडास, बाथरूम, एसी रूम अशा सुविधा आहेत. तसेच परिसर अतिशय हवेशीर आहे.

या ठिकाणी शासनाचे कोरोना रुग्णांसाठीचे जम्बो कोविड केअर सेंटर सुरु करण्यास आम्ही उत्सुक आहोत. येथे दाखल होणाऱ्या कोरोना रुग्णांना रोज चहा, नाश्ता व दोन वेळचे जेवण मोफत देण्याची व्यवस्था आम्ही करू इच्छितो. या नियोजित जम्बो कोविड केअर सेंटर साठी आपण प्रत्यक्ष पाहणी करून मान्यता द्यावी. हे जम्बो कोविड केअर सेंटर येथे तातडीने सुरू करावे. या सेंटर मध्ये शासनाने आवश्यक ते डॉक्टर्स व नर्सेस हा स्टाफ व वैद्यकीय सेवा द्यावी एवढी आमची अपेक्षा आहे. झाडलोट साफसफाई व अन्य अनुषंगिक कामांसाठी आमच्याकडे स्टाफ आहे. या जम्बो सेंटर मध्ये शासन ज्या करोना रुग्णांना पाठवेल त्यांची चोख व्यवस्था आमच्या रिसॉर्टतर्फे केली जाईल.

माजी आमदार विनायक निम्हण यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, केवळ सामजिक बांधिलकी जपण्याच्या हेतूने दिवसेंदिवस वाढतच असणाऱ्या रुग्ण संख्येमुळे अपुऱ्या सुविधे अभावी नागरीकांना जीव गमवावा लागु नये, म्हणून नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनाने त्वरित निर्णय घेवुन आमच्या प्रशस्त व सोयी सुविधा उपलब्ध असणाऱ्या सनी वर्ल्ड रिसॉर्ट सुसगाव येथे नागरिकांसाठी जम्बो कोविड केअर सेंटर लवकर सूरू करावे अशी विनंती माजी आमदार निम्हण यांनी केली.