पाषाण :
कोरोना चे दिवसेंदिवस वाढत चाललेले प्रमाण लक्षात घेता पुण्यामध्ये प्रत्येक घरा गानिक रुग्ण आढळून येत आहे. ही साखळी अधीक घट्ट होताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. अन्यथा फार मोठे परिणाम सर्वांना भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच कुटुंबामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे परंतू आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी अशा परिस्थितीमध्ये नागरिकांना बाहेर पडावे लागते. हे थांबण्या करिता माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी एक आगळी वेगळी संकल्पना अमलात आणली आहे त्यामुळे कोरोनाच्या शिरकाव झालेल्या कुटुंबा पर्यंत आवश्यक सूविधा पोहचवून कोरोनाचे बाह्य संक्रमण थोपवून कोरोना रोखण्या करिता हातभार लावण्याचा प्रयत्न ते करत आहे. त्यामुळे त्यांनी बाधित कुटुंबांना मदती करिता अभियान राबविले आहे.
या वेळी मॅक न्यूज शी बोलताना सनी निम्हण यांनी सांगितले की, एखाद्या कुटुंबात कोरोनाचा शिरकाव झाला कि बाधित व्यक्तींसह इतरांनी पण होम क्वारंटाईन असणे आवश्यक असते, परंतु बाधित कुटुंबाला आवश्यक गरजांसाठी, औषधांसाठी बाहेर पडण्याची वेळ येते, आणि ते बाहेर पडले कि इतरांना धोका संभवतो. हे टाळता यावे यासाठी बाधित कुटुंबाला घरपोच सेवा देणे आवश्यक आहे. त्यातूनच होम क्वारंटाईन नागरिकांसाठी घरपोच सेवेचे अभियान सुरु करत आहोत.
नागरीकांना विनंती आहे कि, आपण काळजी घ्या, योग्य ते उपचार घ्या, घरी राहा आणि सुरक्षित राहा. तुम्हाला लागणाऱ्या सेवांची जबाबदारी आमच्यावर सोपवा. आपण आमच्यासोबत 8308123555 या क्रमांकावर संपर्क करा. आम्ही अत्यावश्यक बाबींची सेवा आपल्या घरापर्यंत पोहचवू. असे या अभियानाची संकल्पना स्पष्ट करताना सनी निम्हण यांनी सांगितले.
सनी निम्हण यांनी राबवत असलेल्या या अभियाना मुळे अनेक नागरीकांना घरपोच सुविधा उपलब्ध होत आहे. त्यामुळे अशा नागरिकांची सुरक्षितता पाहिली जात आहे व इतर नागरीकांना त्यांच्या पासुन संसर्ग होण्याचा धोका कमी होत आहे. एकुणात या आगळ्या वेगळ्या संकल्पनेत सनी निम्हण यांची नागरिका प्रति असणारी आस्था दिसून येत आहे. कोरोना पासुन नागरीकांना सुरक्षा प्राप्त व्हावी. नागरीकांच्या अडचणी दूर होतील यासाठी ते वेगवेगळ्या संकल्पनेतून नागरिकांना मदत करत आहे. त्यामुळे बरेच नागरिक त्यांच्या समाजकार्याबद्दल त्यांची प्रशंसा करत आहे. व या कठीण प्रसंगी नागरीकांना मदत करत असल्याने त्यांचे आभार मानत आहे.