पाषाण :
सद्या कोरोणामुळे परिस्थीती गंभीर होत आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा भासू नये ह्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत कोकाटे तालीम मंडळ ट्रस्ट, कृष्णगंगा सोशल फाऊंडेशन, आणि भाजप युवा मोर्चा, कोथरूड च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांनी मोठया प्रमाणात प्रतिसाद देत 100 जणांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदान करणाऱ्या दात्यास प्रमाणपत्र देण्यात आले.







या वेळी आयोजक रोहन कोकाटे यांनी सांगीतले की, आजच्या या कठीण काळात युवा वर्ग पुढे सरसावतो आहे हे पाहून खूप अभिमान वाटतो. ह्या युवा वर्गाचे नेतृत्व करायची संधी मिळालेली असताना सर्वांना सोबत घेऊन एकजुटीने आपण समाजासाठी काहीतरी योगदान देऊ शकतो ह्याचे समाधान वाटते. रक्तदान शिबिरास युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कठीण काळात हा प्रत्येक रक्तदाता एक सैनिकासारखा आहे, असे त्यांनी सांगितले
या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, यांनी भेट देऊन सर्वांचे मनोबल व उत्साह वाढविला. त्यांनी युवकांचा उत्साह पाहून आनंद व्यक्त केला, आजच्या कठीण परिस्तिथी चे भान ठेवून युवक वर्ग आपली जबाबदारी पार पाडत आहेत याचा अभिमान वाटतो, रोहन कोकाटे आणि त्याचे युवा कार्यकर्ते नेहमीच नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर असतात. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे असेही त्यांनी सांगितले.

तसेच या वेळी रवी अनांसपुरे, सरचिटणीस राजेश पांडे, युवा मोर्चा चे शहराध्यक्ष राघवेंद्र मानकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, उपाध्यक्ष राहुल कोकाटे, स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर, युवा मोर्चा कोथरूड अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, कुलदीप साळगावकर, युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रतीक देसरडा, अभिजीत राऊत, राजु परदेशी, सुनिल मिश्रा, दिपक पवार, अक्षय वायाळ, रमेश चव्हाण, मानिश पेडेकर, उत्तम जाधव प्रभाग अध्यक्ष नवनाथ ववले, अमर कोकाटे तसेच मंडलातील युवा मोर्चाचे निलेश सोनावणे, ऋषींकेश बराटे, स्वप्निल राजिवडे, सोहम मुरकुटे, गोविंद कोकाटे, कालिदास कोकाटे, अप्पा कोकाटे, दगडे नाना , प्रदिप कोकाटे, वासुदेव कोकाटे, नारायण कोकाटे, अशोक दळवी, नितीन निम्हण, शिवाजी कोकाटे, तानाजी कोकाटे, संदीप कोकाटे, रत्नाकर मानकर, राजाभाऊ सुतार, चैतन्य तिवारी, अनिल कोकाटे, बाळु ढोरे, तसेच या वेळी कोकाटे तालीम , कृष्णगंगा सोशल फाऊंडेशन व युवा मोर्चा पाषाण परिसरातील विविध सामाजिक मंडळे ,संस्था, व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.








