पाषाण :
सद्या करोनामुळे सगळीकडे भयभीत वातावरण आहे अशा परिस्थितीत प्रत्येकाला आपला भाग सुरक्षित असावा असे वाटते नागरिकांचीही लक्षात घेऊन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी “सॅनिटाईझ विथ सनी” हे अभियान गेल्या काही दिवसांपासून राबविले आहे. सनी निम्हण यांनी आतापर्यंत आपल्या संकल्पनेतून नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत.
‘सॅनिटाईझ विथ सनी’ अभियानाअंतर्गत नागरीकांच्या मागणी नुसार पाषाण गावातील समता मित्र मंडळ, सर्व्हे न.1, रमेश निम्हण विटभट्टी, अशोक निम्हण विटभट्टी, लोंढे वस्ती, विठ्ठल अप्पा निम्हण चाळ, गोविंद निम्हण चाळ, मारुती आण्णा निम्हण चाळ, पंचशील नगर, चव्हाण चाळ, पाषाण चौकात रस्त्यलगतच्या सर्व दुकाने मधली आळी, बालाजी ट्रेडर्स चिंचेची आळी, कुंभार वाडा, ओझा किराणा, म.न.पा हॉस्पीटल, भाजी मंडई, ताई ऑर्किड, सार्वजनिक स्वच्छतागृह, आदमाने वाडा, सातव भट्टी,बाणेकर चाळ, शाम निम्हण चाळ, जाधव वाडा, संभाजी चौक,तिखे वाडा, रस्त्या लगतच्या सर्व दुकाने, पाषाण व सुतारवाडी, सुसरोड या सर्व ठिकाणी फवारणी करण्यात आली. नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
यावेळी सनी निम्हण यांनी सांगितले की, नागरीकांना सुरक्षीत वाटावे म्हणून त्यांचा परिसर निर्जंतुक करण्यासाठी फवारणी करत आहोत. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्य सुरक्षीत राहण्यास मदत होईल. त्यांनी नागरीकांना आव्हान केले की, “सॅनिटाईझ विथ सनी” अभियानाचा लाभ घेण्यासाठी व आपला परिसर सुरक्षित करण्यासाठी आम्हाला 8308123555 या नंबर वर संपर्क करावा.