एसआरपीएफ जवानांसाठी दिलासादायक निर्णय… 

0
slider_4552

मुंबई :

राज्य राखीव पोलीस दलातील जवानांच्या प्रश्नांबाबत आज मंत्रालयात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या जवानांच्या जिल्हा पोलीस दलातील बदलीकरता आवश्यक सेवेची अट 15 वर्षांवरून 12 वर्षे करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तसेच जिल्हा पोलीस दलातील बदलीनंतर जिल्हा पोलीस मुख्यालयातील कर्तव्य कालावधी 5 वर्षांवरून 2 वर्षांवर करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसआरपीएफ जवानांसाठी घेतलेल्या या दिलासादायक निर्णयाबद्दल आदित्य ठाकरे यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

या निर्णयासाठी ठाकरे यांनी पाठपुरावा केला होता. त्यांच्या विनंतीवरुन एसआरपीएफ जवानांच्या या प्रश्नाबाबत समितीही गठीत करण्यात आली होती.

या समितीच्या शिफारशीनुसार झालेल्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांची दीर्घकालीन मागणी पूर्ण झाली आहे. निर्णयामुळे एसआरपीएफ जवानांचे मनोबल उंचावणार असून अधिक कार्यक्षमतेने कर्तव्य बजावण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. या निर्णयाबद्दल ठाकरे यांनी गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, अतिरिक्त पोलीस महासंचालक अर्चना त्यागी यांचेही आभार मानले आहेत.

See also  मुंबईत पुन्हा नाईट कर्फ्यू लागू करा ! महापालिका आयुक्तांची उद्धव ठाकरेंकडे मागणी