पिंपरी :
पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. ही घटना आज (बुधवारी, दि. 12) दुपारी दीड वाजताच्या सुमारास चिंचवड स्टेशनजवळ घडली आहे.







मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड स्टेशनजवळ आमदार अण्णा बनसोडे यांचे कार्यालय आहे. त्याच परिसरात एका व्यक्तीने बुधवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास पिस्तुलातून गोळी झाडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र नेमक्या कोणत्या कारणातून हा गोळीबार करण्यात आला, याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी आपला तपास सुरू केला असून या तपासानंतरच गोळीबारामागील नेमकं कारण कळू शकणार आहे. या प्रकरणी तानाजी पवार यास ताब्यात घेतले आहे. आरोपीने पिस्तूलातून चार गोळ्या झाडल्या आहेत.माहिती पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर भरदिवसा गोळीबार झाला आहे. दुपारी दीडच्या सुमारास घडली घटना आहे. या घटनेत कोणालाही जखम झालेली नाही. पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. याप्रकरणी चौकशी करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरीचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे यांनी दिलीये. पिंपरी चिंचवड पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरु आहे. अण्णा बनसोडे यांच्यावर ठेकेदारीच्या वादातून गोळीबार झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.








