बाणेर येथे गरजू लोकांना शिवसेनेच्या वतीने धान्य कीट वाटप !

0
slider_4552

बाणेर :

सध्या कोरोनामुळे सगळीकडे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. बऱ्याच लोकांचे व्यवसाय थांबले गोरगरिबांचे काम बंद असल्यामुळे त्यांना दोन वेळचे अन्न मिळणे मुश्किल झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात पुढे करण्या करिता शिवसेना कोथरूड मतदार संघ प्रभाग क्रमांक ९ च्या वतीने बाणेर येथे गरजू लोकांना धान्य कीट वाटप करण्याचा कार्यक्रम शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे यांच्या हस्ते झाला.

या कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ शिवसैनिक बाणेर नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दिलीप मुरकुटे यांनी केले. त्यांनी वाढदिवसा वरील होणारा इतर खर्च टाळून या धन्याचे किट वाटप गोरगरीब नागरिकांना केले. तसेच अत्यंत बिकट परिस्थिती असलेले स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन महिलांचा प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात आगीने होरपळलेले मारुती बनकर यांना शिवसेनेच्या वतीने डॉ. दिलीप मुरकुटे यांच्याकडून ११००० रू मदत या वेळी करण्यात आली. ४०० नागरीकांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी सांगितले की, समाजात वावरताना एक शिवसैनिक म्हणुन सामाजिक बांधिलकी कशा प्रमाणे जपावी हे डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या कडून शिकावे. कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता नेहमी सतत समाजासाठी कार्यरत राहुन
गोरगरिबांना मदत करण्याचे काम ते करतात ही फार कौतुकास्पद बाब आहे. शिवसेना नेहमी सर्वसामान्यांच्या मदतीला अग्रेसर असते, शिवसेना कधीही सत्त्ते साठी काम करत नाही. शिवसेना सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करत असते. कोणत्याही पदाची लालसा न धरता शिवसैनिक काम करत आहे पक्ष प्रमूख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतत्वाखाली महाराष्ट्र प्रत्येक संकटाला तोंड देत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी प्रास्ताविक करताना डॉ. दिलीप मुरकुटे यांनी सांगितले की, कोरणा च्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन सुरू असल्यामुळे सर्वसामान्यांना आपले जीवन जगणे मुश्कील होत आहे. काम बंद असल्यामुळे बऱ्याच लोकांना दोन वेळचे अन्न मिळणे अवघड आहे. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना सामाजिक बांधिलकीच्या नात्याने मदत व्हावी म्हणून एक शिवसैनिक म्हणुन धान्याचे किट वाटप करीत आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने अडचणीच्या प्रसंगी संयमी कुशल नेतृत्व दाखवून महाराष्ट्राला कोरोणाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्याला यशही आले, त्यांच्या या कार्याला थोडासा हातभार लावण्याचे काम एक शिवसैनिक म्हणुन करत आहे असे त्यांनी सांगीतले.

See also  स्मार्ट प्रभागाचे स्मार्ट नगरसेवक अमोल बालवडकर : राजेश पांडे

या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, ॲड. पांडुरंग थोरवे, बाळासाहेबभांडे, राम गायकवाड, ॲड. दिलीप शेलार, ॲड. सुदाम मुरकुटे, लहू सायकर, सुनील कळमकर, सुभाष झगडे, कृष्णा शिंदे, किरण मुरकुटे, अमित रणपिसे, संतोष भोसले, बाळू हगवणे आदी मान्यवर उपस्थित होते.