पाषाण :
माहेश्वरी समाज बाणेर – बालेवाडी यांस कडून महेश सदभाव संघटन अंतर्गत सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून असित शहा, बसंत राठी, मनोज भट्टड यांच्या कडून पाषण, सुतारवाडी व सोमेश्वरवाडी गावातील स्मशानाभूमी साठी स्वर्गारोहण स्टिलची शिडी लोकार्पण बुढवाकरण्यात आली. कार्यक्रम बुधवार दि. ९/६/२०२१ रोजी प्रकाश पाषाणकर यांच्या दत्त मंदिरात संपन्न झाला.
अंत्यविधी साठी लागणारी शिडी उपलब्ध करून देण्याची ऐक वेगळी संकल्पना माहेश्वरी समाजाच्या वतीने राबविण्यात आली. त्याचा निश्चीतच अंत्यविधी साठी स्वर्गारोहण शिडीचा वापर होणार आहे.
वेळी माहेश्वरी समजाकडून संजयजी जखोटिया, राजेंद्रजी तापडिया, गिरधरजी राठी, रितेश राठी, चंद्रकांत जाधव, व संतोष राठी तसेच पाषाण, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी परिसरातील मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.