डॉ. सागर बालवडकर यांनी विविध सामाजिक उपक्रमामुळे वेगळी ओळख निर्माण केली आहे : पोलीस उपनिरीक्षक चव्हाण. 

0
slider_4552

औंध :

वाहतूक नियंत्रण करत असताना समाजातील काही लोकांशी घनिष्ट मैत्री होत असते. कोरोना काळात देखिल खंबीर पणे काम करणाऱ्या वाहतूक पोलिसांची कामाची दखल घेऊन डॉ. सागर बालवडकर यांनी सामाजिक बांधिलकी कशी जपावी हे दाखवून दिले आहे. दुर्लक्षित घटकांना मदत करण्याचे काम ते करतात.त्यांच्या कामाच्या वेगळया पद्धतीने निश्चित एक वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली आहे, असे मत पोलीस उपनिरिक्षक अरविंद चव्हाण यांनी व्यक्त केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनानिमित्त कोरोनाच्या काळात देखिल फ्रंट लाईन वर्कर म्हणून, ज्यांनी आपल्या जिवाची परवा न करता सर्वसामान्यांनच्या सुरक्षिततेसाठी झटणाऱ्या वाहतूक पोलिस यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. वाहतूक पोलिसांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ९ च्या वतीने डॉ. सागर बालवडकर यांच्याकडून पावसाळ्यासाठी रेन कोट वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.

या वेळी बोलताना डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले की, कोरोना काळात देखील पोलीसांनी आपला जीव धोक्यात घालून नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षितेसाठी नियमांचे पालन करावे याचे नियोजन केले. अशा कठीण प्रसंगी समाजासाठी त्यांनी केलेले योगदान खूप मौल्यवान आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व कार्यकर्ते समाजातील गरजूंना योग्य ती मदत करण्याचा प्रयत्न करतो, वाहतूक पोलिसांना अनेक वेळा नागरिक उद्धटपणे बोलून त्रस्त करतात, असे न करता त्यांना सहकार्य करावे नियमांचे पालन करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी अरविंद चव्हाण पो. उपनिरीक्षक, विलास पगारे पो. उपनिरीक्षक, रूपाली बालवडकर, विशाल विधाते, समीर चांदेरे, प्राची श्रीवास्तव, नितिन कळमकर, ओमकार रणपिसे, सिद्धार्थ कलशेट्टी, सचिन शिंदे, राया बालवडकर आदी उपस्थित होते.

 

See also  भाजप विरुद्ध महा विकास आघाडी क्रिकेट सामन्यांमध्ये भाजपचा निसटता संघर्षमय विजय....