औंध :
सोमेश्वरवाडी येथे सनी निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर स्पोर्ट्स क्लब आयोजित करण्यात आलेल्या नाईट क्रिकेट सामन्यांमध्ये भाजप विरुद्ध महा विकास आघाडी असा प्रदर्शनीय रंगतदार सामना झाला. या क्रिकेट संघामध्ये बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, सोमेश्वरवाडी, सुतारवाडी परिसरातील राजकीय पदाधिकारी व नेत्यांनी सहभाग घेऊन सामना रंगतदार होण्यास मदत केली व या सामन्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचा एक धावांनी आपला विजय नोंदवला.
भाजपाच्या संघामधून कॅप्टन म्हणून माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांची निवड करण्यात आली व त्यांच्या नेतृत्वाखाली संघांनी उत्कृष्ट खेळाची कामगिरी केली. या संघांमध्ये नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेवक सनी निम्हण, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, स्वीकृत सदस्य सचिन पाषाणकर, लहू बालवडकर, प्रवीण आमले, लखन कळमकर, विराज कोकाटे, अभिजीत पाषाणकर, सुप्रीम चोंधे अशी अकरा जणांची टीम करण्यात आली. तर महा विकास आघाडी मध्ये कॅप्टन म्हणून माजी आमदार विनायक निम्हण यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक शिवाजी बांगर, माजी स्वीकृत सदस्य बालम सुतार, विकास रानवडे, बाळासाहेब बामगुडे, काशिनाथ दळवी, अभय मांढरे, सुनील काशीद, जुनवणे, सुनील गोडांबे, तारामन जाधव.
भारतीय जनता पक्ष पक्षाच्या टिमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये त्यांची धावसंख्या 34 झाली व जिंकण्यासाठी महा विकास आघाडीला 35 धावांची आवश्यकता होती. या धाव संख्येमध्ये अमोल बालवडकर यांनी दोन चौकारांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढण्यास मदत झाली. तर गोलंदाजी करताना प्रल्हाद सायकर यांनी महा विकास आघाडीच्या महत्त्वाच्या दोन विकेट घेतल्या. त्यामुळे भाजपच्या विजयामध्ये या दोघांचे नावाची चर्चा चांगलीच रंगली. तर बालेवाडी मधील लहू बालवडकर व अमोल बालवडकर यांची संघाला विजय मिळवून देण्यासाठी सामंजस्य खेळी या सामन्यादरम्यान पाहावयास मिळाली.
आमदार विनायक निम्हण यांनी यष्टीरक्षण करत असताना महा विकास आघाडी साठी एक झेल व एक स्टपींग अशा दोन महत्वपूर्ण विकेट आपल्या संघाला मिळवून दिल्या. त्यामुळे भाजपाच्या रणांची चाललेली घोड दौड काही प्रमाणात मंदावली .
भाजपने दिलेले लक्ष साध्य करण्यासाठी फलंदाजी करताना महाविकासआघाडी कडून अभय मांढरे, विकास रानवडे, बाळासाहेब बामगुडे यांनी चांगली खेळी करत लक्ष गाठण्याचा प्रयत्न केला शेवटच्या षटकांमध्ये सहा चेंडू मध्ये सहा धावा असा रोमांचक सामना रंगला. बामगुडे व गोडांबे यांनी प्रयत्न केला. परंतु अभिजीत पाषाणकर यांच्या गोलंदाजीपुढे तो असफल ठरला. दोन चेंडू दोन धावा राहिले असता पाषाणकर यांनी निर्धाव चेंडू टाकला. अखेर एक चेंडू मध्ये दोन धावा करण्याचा क्षण आला तो चेंडू ही निर्धाव टाकल्यामुळे भाजपाचा 1 धावांनी विजय मिळवण्यात यशस्वी झाले.
या क्रिकेट सामन्यात मध्ये उत्कृष्ट फलंदाजी केल्याबद्दल अमोल बालवडकर यांना 501 रुपयाचे पारितोषिक गोविंद रणपिसे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या क्रिकेट मॅचची अतिशय रोमांचक राजकीय भाषेत समालोचन भाजपचे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर व शिवसेनेचे कोथरूड विभाग संघटक संजय निम्हण यांनी केले. या स्पर्धेची फायनल मॅच व बक्षिस वितरण सोहळा २ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.
पहा क्रिकेट सामन्याचे क्षणचित्र