अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक

0
slider_4552

मुंबई-
अभिनेत्री  उर्मिला मातोंडकर यांचे  इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. या संदर्भात त्यांनी महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांनी ट्विटर अकाउंटवरून ही माहिती दिली.
उर्मिला यांनी ट्वीट करत म्हटलं की, ‘माझं इन्स्टाग्राम अकाउंट हॅक करण्यात आलं आहे. सुरुवातीला ते थेट मेसेज करताना आणि काही स्टेप फॉलो करायला सांगतात. नंतर ते अकाउंट व्हेरिफाय करतात आणि मग ते हॅक होतं.’

उर्मिला पुढे म्हणाल्या की सायबर क्राइमला कोणीही हलक्यात घेऊ नये. यानंतर दुसर्‍या ट्वीटमध्ये उर्मिलाने सांगितले की त्यांनी अकाउंट हॅक झाल्याची अधिकृत तक्रार नोंदवली आहे.
त्यांनी लिहिलं की, ‘सायबर क्राइम ही एक अशी गोष्ट आहे ज्याकडे महिलांनी दुर्लक्ष करता कामा नये. इन्स्टाग्राम अकाउंट हॅक झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी पोलिसांकडे गेली असता, मी डीसीपी रश्मी करंदीकर यांना भेटले. त्यांनी मला या गुन्ह्याशी संबंधीत बरीच माहिती दिली.

See also  अविनाश भोसले या प्रख्यात बांधकाम व्यावसायिकाची मालमत्ता इडी कडून सील !