सातारा प्रतिनिधी : –
सकल मराठा समाज, मुंबई आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक यांनी खासदार, छत्रपती श्री उदयन राजे यांची भेट घेऊन मुंबई राज्यव्यापी बैठकीसाठी निमंत्रण दिले. दि. १७ डिसेंबर २०२० रोजी मराठा क्रांती मोर्चा, मुंबईच्या समन्वयकांनी खासदार, छत्रपती श्री उदयन महाराज यांची भेट घेतली.
मराठा आरक्षणाची सद्यस्थिती, आघाडी सरकारची मराठा प्रश्नांबाबतची उदासीनता, निष्क्रियता व नाकर्तेपणामुळे होणारे समाजाचे नुकसान आणि मराठा क्रांती मोर्चाची पुढील वाटचाल याचे नियोजन करण्यासाठी मुंबईत रविवारी २० डिसेंबर रोजी राज्यव्यापी बैठक होणार आहे. सदरच्या बैठकीस उपस्थित रहाण्यासाठी निमंत्रण देण्यासाठी भेट घेतली होती. यावेळी मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र तर्फे महाराजांना समशेर भेट देण्यात आली.
याप्रसंगी मुंबईचे समन्वयक बलराम भडेकर, विलास सुद्रीक, प्रफुल्ल पवार, अभिषेक लोके, अनिल गाडेकर, नाशिक येथील समन्वयक राजेश पवार, प्रशांत पाटील, पुण्याचे समन्वयक केदार कदम, सांगली येथील समन्वयक प्रवीण पाटील, कराडचे समन्वयक संतोष पाटील, सातारा येथील समन्वयक वैभव शिंदे, ऍड उमेश शिर्के, सविता शिंदे, रत्नमाला भागडे हे सर्व उपस्थित होते.
*मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक दि. २० डिसेंबर २०२० रोजी सकाळी १० वाजता वडाळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, सहकार नगर, वडाळा प, मुंबई येथे होणार असून ह्या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहनही मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र तर्फे करण्यात आले.