इगो सोडा कारशेड साठी अरे मध्ये दिलेली जागा वापरा : देवेंद्र फडणवीस

0
slider_4552

मुंबई :  प्रतिनिधी :-

इगो सोडा, सुप्रीम कोर्टाने मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमध्ये दिलेली जागा वापरा, असा सल्ला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. हायकोर्टाने राज्य सरकारला अक्षरशः चपराक दिली आहे, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरे सरकारचा समाचार घेतला. कांजूर मेट्रो कारशेडचे काम ताबडतोब थांबवा, परिस्थिती जैसे थे ठेवा, असे आदेश उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला दिले आहेत.

राज्य सरकारने एमएमआरडीएला दिलेले आदेश चुकीचे असल्याचं मी कालच सभागृहात सांगितलं होतं, हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता कांजूरमार्गमध्ये काम होऊ शकत नाही. समजा ती जमीन क्लीअर असती, तरी कारशेड तिथे नेणं चुकीचंच आहे, असा सौनिक समितीचा अहवाल होता. मग राज्य सरकारचा अट्टाहास का? असा सवाल फडणवीसांनी विचारला.

इगोसाठी मुंबईकरांना मेट्रोपासून वंचित ठेवण्याचं काम सरकार करत आहे, इगो सोडा आणि सुप्रीम कोर्टाने दिलेली आरेची जागा वापरा. मुंबई मेट्रो 2021 पर्यंत मुंबईकरांना मिळणार होती, पण आता 2024 पर्यंत लांबली आहे. फक्त राज्य सरकारच नाही, तर केंद्राचाही यामध्ये 50 टक्के वाटा आहे. केंद्रीय समितीकडूनही पत्राद्वारे मेट्रो कारशेड हलवण्यास नकार देण्यात आला होता. कांजूरमार्गला कारशेड नेलं असतं, तरी आरेमध्ये मेट्रो रॅकचं काम करावंच लागलं असतं, असं फडणवीस म्हणाले.

See also  फक्त अठरातासात २६ किमीचा रस्त्यावर डांबरीकरणाचे काम पूर्ण : वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार नोंद