बाणेर :
राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग क्रमांक ९ व बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व पुणे जिल्हा कबड्डी असो.चे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व पुणे जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय पुरुष विभाग (जिल्हा संघ) व महिला विभाग (सांघिक संघ) निमंत्रित कबड्डी स्पर्धा २०२१ घेण्यात येत आहे.
या वेळी नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी सांगितले की, कोरोनामुळे गेल्या वर्षभरा पेक्षा जास्त कालावधीमध्ये सगळे जण त्रस्त आहेत. सध्या कोरोना चे प्रमाण बऱ्याच अंशी कमी झाले असून, सर्वसाधारण जनजीवन पूर्वपदावर येत आहे. वारंवार कोरोना संसर्ग वाढल्याने कराव्या लागणाऱ्या लॉकडाउन मुळे बऱ्याच कालावधीपासून क्रीडा क्षेत्राला देखील सर्व स्पर्धा थांबावाव्या लागले आहेत. त्यामुळे विविध क्रीडापटूंना आपले कसब दाखविण्या पासून वंचित राहावे लागले आहे. ही मरगळ झटकून देण्याच्या दृष्टीने भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन प्रभाग क्रमांक 9 राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे निश्चितच कबड्डी क्षेत्रामध्ये नवचैतन्य निर्माण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या स्पर्धेमध्ये सहभागी होताना सर्वांनी सरकारने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करावे असे आव्हान त्यांनी सर्वांना केले.
या स्पर्धेचे कार्याध्यक्ष किरण बाबुराव चांदेरे यांनी मॅक न्यूज सोबत बोलताना सांगितले की, सदर स्पर्धा ही कबड्डी क्षेत्राला नवी उभारी देण्याच्या दृष्टीने व गेल्या वर्षभरापासून बंद असलेल्या स्पर्धा सुरू करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे. २००६-२००७ पासून सदर स्पर्धा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी घेण्यात येत असते. परंतु गतवर्षी कोरोना महामारी मुळे सदरची स्पर्धा खंडित झाली होती. कोरोना चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न होणार आहे. या स्पर्धेत पुरुष विभागातील तेरा जिल्हा संघ व महिला विभागातील बारा संघ सहभागी होणार असून स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला रोख रक्कम बक्षीस दिले जाणार आहे. तसेच पहिल्या चार क्रमांकामध्ये येणाऱ्या पुरुष व महिला संघांना समसमान रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. याव्यतिरिक्त वैयक्तिक कौशल्य दाखवणाऱ्या खेळाडूंना देखील दुचाकी व इतर आकर्षक बक्षिसे या स्पर्धेच्या निमित्त मिळणार आहे. खेळाडूंनी प्रशिक्षकांनी पंचांनी स्पर्धेच्या नियमाचे पालन करून सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपयोजना चा वापर करून सदर स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आव्हान कार्याध्यक्ष किरण चांदेरे यांनी केले.
सदर स्पर्धा नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असुन स्पर्धेची संयोजन समिती पुढील प्रमाणे असणार आहे :
अध्यक्ष – मधुकर नलावडे,
उपाध्यक्ष – बाळासाहेब बोडके, चंद्रशेखर जगताप, अरुण खंडेलवाल, अवधूत लोखंडे
कार्याध्यक्ष – किरण चांदेरे,
सदस्य – नितीन कळमकर, राजेंद्र आंदेकर, दत्ता झिंजुर्डे, डॉ.सागर बालवडकर, दत्तात्रय कळमकर, अमोल भोरे, विशाल विधाते,
स्थळ : शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॉक्सिंग हॉल, म्हाळुंगे – बालेवाडी, पुणे – ४५.