शिवसेना विभाग प्रमुख संतोष तोंडे यांच्यावतीने रिक्षाचालकांसाठी अन्य धान्य किट वाटप

0
slider_4552

सुसरोड :
शिवसेना विभाग प्रमुख संतोष तोंडे यांच्यावतीने शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून, शहर प्रमुख गजानन थरकुडे आणि उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे यांच्या हस्ते, सुतारवाडी पाषाण सुसरोड भागातील रिक्षाचालकांसाठी अन्य धान्य किट वाटप करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी सांगितले की, शिवसेना नेहमीच गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत असते करणामुळे या भागातील रिक्षाचालकांना आर्थिक फटका बसला आहे त्यामुळे त्यांची ही गरज लक्षात घेऊन संतोष तोंडे यांनी केलेली मदत निश्चितच खूप गरजेचे होते. रिक्षाचालकांना आर्थिक अडचण लक्षात घेऊन शिवसेनेच्या वतीने जो मदतीचा हातभार लावला जातोय तो निश्चितच कौतुकास्पद आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

मॅक न्यूज शी बोलताना कार्यक्रमाचे आयोजक विभाग प्रमुख संतोष तोंडे यांनी सांगितले की, परिसरामध्ये बहुसंख्य रिक्षा चालक-मालक असल्याने यांच्या विस्कळीत झालेल्या कुटुंबातील गरजा लक्षात घेऊन त्यांना अन्नधान्याचे किट वाटपाचा निर्णय घेतला, निश्चितच त्यांना ही मदत उपयोगी राहील. अशा पद्धतीने समाजातील गरजूंना सतत मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी शिवसेनेच्या वतीने दिली.

कर्यक्रमास शिवसेना शहर प्रमुख गजानन भाऊ थरकुडे व उपशहर प्रमूख राजेंद्र धनकुडे यांचा हस्ते वाटप करण्यात आले. कर्यक्रमास विभाग संघटक संजय निम्हण, विभाग प्रमुख संतोष तोंडे, उपसंघटक दिनेश नाथ, युवा सेना अधिकारी अमित रणपिसे, ॠषिकेश कुलकर्णी, शाखा प्रमुख अजिंक्य सुतार, जेष्ठ शिव सैनिक लक्ष्मण दिघे व शिव सैनिक उपस्तीथ होते.

See also  बालेवाडीतील अनाधिकृत बांधकामे पाडली पालिका अधिकारी म्हणाले...