पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावांचा नियोजनबद्ध विकास करू : नगरसेवक बाबुराव चांदेरे

0
slider_4552

पुणे :

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पुण्यातील काही आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये काल एक बैठक पार पडली. या बैठकीत पुणे महानगरपालिकेत २३ गावांचा समावेश करण्यात यावा यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. या निर्णयानंतर पुणे महापालिका ही राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असणारे महापालिका ठरणार आहे. तशी अधिसूचना नगरविकास खात्याने आज काढून २३ गाव महापालिकेत समाविष्ट करण्यावर अंतिम शिक्कमौर्तब आज केले.

२३ गावांच्या समावेश झाल्याने नगरसेवक बाबुराव चांदेरे यांनी मॅक न्यूज शी बोलताना सांगितले की, पुणे महानगरपालिकेमध्ये हद्दीलगतची २३ गावे महानगरपालिकेत समाविष्ट केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या महाविकास आघाडीतील सर्व नेते मंडळींचे मनापासून मी व माझ्या परिसरातील नागरिकांच्या वतीने अभिनंदन करतो, या पुढच्या कार्य काळामध्ये महाआघाडी म्हणून व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी म्हणून या परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू असे बाबुराव चांदेरे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले सन १९९७ साली पुणे महानगरपालिकेमध्ये बाणेर – बालेवाडी या परिसराचा समाविष्ट झाला त्यानंतर आज पर्यंत बाणेर बालेवाडी चा नियोजनबद्ध विकास करण्यामध्ये आम्ही पूर्णपणे यशस्वी झालेलो आहे, यामध्ये माननीय शरदचंद्र पवार साहेब, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांचे मोठे पाठबळ असल्यामुळे आम्ही या परिसराचा विकास करू शकलो याच धर्तीवर सुस आणि म्हाळुंगे गावांचा नियोजनबद्ध विकास आम्ही निश्चितपणे करू असा विश्वास स्थायी समितीचे माजी अध्यक्ष तथा नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी व्यक्त केला.

महापालिकेत समाविष्ट गावे :

म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रुक, किरकिटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नर्हे, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, वडाची वाडी, शेवाळेवाडी, नांदोशी, सणसनगर, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभूळवाडी, कोळेवाडी आणि वाघोली या २३ गावांचा पुणे महापालिकेत समावेश करण्यात आला आहे.

See also  बालेवाडी येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन.