महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे ५ जुलै ला राज्यव्यापी आंदोलन

0
slider_4552

भुसावळ :

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सोमवार दि. ५ जुलै रोजी एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यामुळे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी काळया फिती लावून काम करणार आहेत तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, तहसील कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष एस. एस .अहिरे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीश एस नेमाडे यांनी केले आहे.

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व संघटनेमार्फत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शिक्षक परिषदेने राज्यात ५ जुलै रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आंदोलनाच्या इशार्‍याचे पत्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व शिक्षण सचिवांना पाठविण्यात आले आहे.

See also  देशातील तुरुंगाचे खासगीकरण झाले आहे का? : संजय राऊत