पुणे :
आज पुण्यातील विधानभवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते रिएटर इंडिया स्विक्झॅर्लंड स्थित मल्टी नॅशनल कंपनी तर्फे “पावर्ड एयर प्युरीफयिंग रेस्पिरातर” अर्थात श्वास घेण्यासाठी 99% शुद्ध हवा पुरविणाऱ्या १४ मशीनचे वाटप केले. या मशीनींची एकुण किंमत २५ लाख रुपये इतकी आहे.
ह्या मशीन कोविड वॉर्ड मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर व नर्सेस साठी खूप उपयुक्त आहे. इन्फेक्शन होण्यापासून बचाव करणे हे ह्या मशीनचे काम आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने हे मशीन प्राप्त झाले. हे मशिन पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रुबल आगरवाल यांच्याकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आले .
याप्रसंगी आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रूबल आगरवाल, नगरसेवक बाबुराव चांदेरे, रिएटर कंपनी तर्फे अनिल कुडाळ, जॅार्ज शाहिद, शैलेंद्र कुलकर्णी व ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रमाचे आयोजन केले ते बाबुराव चांदेरे सोशल फाऊंडेशनचे खजिनदार चंद्रशेखर जगताप, समीर चांदेरे, चेतन बालवडकर, ओंकार रणपिसे, सचिन शिंदे इत्यादी मान्यवर या वेळी उपस्थित होते.