महाराष्ट्रातील जवान प्रदीप मांदळे काश्मीरमध्ये कर्तव्य बजावताना शहीद

0
slider_4552

मॅकन्यूज :

भारतीय सैन्य दलात महार रेजिमेंटचे पराक्रमी जवान प्रदीप मांदळे यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले. जम्मू काश्मीरमधील द्रास टायगर हिल भागात ते आपलं कर्तव्य बजावत होते. तेथे मंगळवारी (१५ डिसेंबर) मध्यरात्री त्यांना वीरमरण आले. प्रदीप हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. त्यांचे मूळ गाव बुलडाणा जिल्ह्यातील पळसखेड आहे.

वीर जवान प्रदीप मांदळे शहीद झाल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाला १५ डिसेंबरला रात्री कळवण्यात आली. या घटनेने मांदळे कुटुंब हादरून गेले. ही माहिती गावात कळल्यानंतर पळसखेड गावातील राहिवासीरना देखील शोक अनावर झाला. प्रदीप २००८-०९ मध्ये लष्करात भरती होऊन महार रेजिमेंटमध्ये दाखल झाला. प्रदीप यांच्या पश्चात पत्नी कांचन, आणि तीन मुले असा परिवार आहे.

“भारतमातेच्या या वीर सुपुत्राला भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत”, अशा शब्दात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शोक व्यक्त करत प्रदीप मांदळे यांना श्रद्धांजली वाहिली.

 

See also  कडक लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नये, हा शेवटचा इशारा आहे : मुख्यमंत्री