जपान मध्ये कोरोना मुळे दोन आठवड्यांची आणीबाणी : ऑलिंपिक संदर्भात महत्तवाच्या घोषणांची शक्यता

0
slider_4552

टोकियो:

कोरोना संकटाचे कारण देत जपानची राजधानी टोकियो येथे दोन आठवड्यांची आणीबाणी लागू करण्यात आली. टोकियो येथे २३ जुलैपासून ऑलिंपिक सुरू होणार आहे. हे ऑलिंपिक २०२० मध्ये होणार होते. पण कोरोना संकटामुळे ऑलिंपिकचे आयोजन २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आले. यंदाच्या वर्षी ऑलिंपिकच्या आयोजनाला एक महिन्यापेक्षा कमी दिवस उरले असताना टोकियो येथे दोन आठवड्यांची आणीबाणी लागू करण्यात आली.

ऑलिंपिकसाठी विदेशी प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही. स्थानिकांना खेळ बघण्याची संधी देणार की नाही याचा निर्णय शुक्रवारी होणार आहे. मात्र आणीबाणी लागू झाल्यामुळे स्थानिक प्रेक्षकांना परवानगी मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे.

बार आणि रेस्टॉरंट्सचे तास कमी करुनही कोरोना संकटाची तीव्रता कमी झालेली नाही. यामुळे ऑलिंपिकच्या काळात बार आणि रेस्टॉरंट्स बंद ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख टोकियोमधील ऑलिंपिकच्या तयारीची तसेच कोरोना स्थितीची माहिती घेणार आहेत. यामुळे पुढच्या आठवड्यात ऑलिंपिक संदर्भात महत्तवाच्या घोषणांची शक्यता आहे.

बुधवारी टोकियोमध्ये ९२० नवे कोरोना रुग्ण आढळले. मे (मे २०२१) महिन्यानंतर एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने टोकियोत कोरोना रुग्ण आढळण्याची ही पहिली वेळ आहे.

See also  इंग्लंडमध्ये असलेल्या भारतीय संघातील २ क्रिकेटपटू कोरोना पॉझिटिव्ह