पाकिस्तानचा गोलंदाज खेळणार पुण्याच्या टीम मध्ये..

0
slider_4552

क्रीडा :

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेला पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने आपल्यावर मानसीक छळ होत असल्याचा आरोप केला होता. पण त्यानंतर आमीरने पुण्याच्या संघाकडून खेळण्याचा निर्णय आता घेतला आहे. आपल्या संघात आमीरला संधी दिल्याचे ट्विट पुण्याच्या संघाने केले आहे.

काही दिवसांमध्ये युएईमध्ये सुरू होणाऱ्या टी-१० लीग स्पर्धेत पुणे डेव्हिल्स असा एक संघ आहे. संघाचे प्रशिक्षकपद दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जाँटी रोड्सकडे देण्यात आलेले आहे. आणि या संघाकडून आता आमीर खेळणार आहे. या .टी-१० लीग ही आबुधाबी येथे २८ जानेवारीपासून सुरु होणार आहे. या लीगमध्ये पुण्याचा संघाची सहमालकी कृष्णा कुमार चौधरी यांच्याकडे आहे. आमीरला संघात स्थान दिले असल्याची माहिती त्यांनीच दिली आहे.

याबाबत चौधरी म्हणाले की, ” जगभरातील स्टार खेळाडूंचा समावेश या लीगमध्ये आहे. त्यामध्ये आमचा संघ असल्याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या संघाचे प्रशिक्षकपद हे जॉंटी रोड्स यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. त्याचबरोबर आमच्या संघात पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर आणि श्रीलंकेचा अष्टपैलू खेळाडू थिसारा परेरा हे दोन मोठे खेळाडू असल्याने आमचा संघ चांगलाच संतुलित झाला आहे.

See also  बॅडमिंटन स्टार तसनीम मीर हीने वयाच्या सोळाव्या वर्षी विश्वविजेती बनण्याचा केला विक्रम