सुतारवाडी :
शिवसैनेचे कोथरूड विभाग प्रमुख संतोष तोंडे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक उपनेते रवींद्र मिर्लेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पुणे शहर प्रमुख संजय मोरे, पुणे शहर प्रमुख गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना रवींद्र मिर्लेकर यांनी सांगितले की, जनसंपर्क कार्यालयाचे उपयोग हा नागरिकांपर्यंत पोहचून त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता करायचा आहे. जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करावे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सांगायचे की जनसंपर्क कार्यालयात समस्या घेवुन आलेला सर्वसामान्य माणूस समाधान घेवुन परत गेला पाहिजे. शिवसेनेत येताना शिवसैनिकांनी गटबाजीचे जोडे बाहेर ठेवले पाहिजे. शिवसेना घराघरात पोहचवली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी शिवसेनेचे कोथरूड संपर्कप्रमुख प्रीतम उपलप, शहर प्रमुख संजय मोरे, शहर प्रमुख गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख राजेंद्र धनकुडे, विभाग प्रमुख संतोष तोंडे, अमित रणपिसे, आशुतोष आमले, दिनेश नाथ, अजिंक्य सुतार, ऋषिकेश कुलकर्णी, रोहित कदम, सुनील राजगुरू, योगेश तुपे, लक्ष्मण दिघे, संदिप सातव,राजु कविटकर, गणेश दळवी, रोहित लोंढे, विजय दाभाडे,सागर सुतार, मुन्ना नगारजी, महादेव चिंतामणी, अमित सुतार, निलेश कोकाटे, दत्ता कोंढाळकर, शिवसैनिक, महिला व स्थानिक नागरिक उपस्थित होते.