महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमधील तणाव हा राजकारणाचा भाग : प्रवीण तोगडिया

0
slider_4552

नागपूर :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि जामीनावरुन झालेलं राजकारण संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं.

या मुद्द्यावरुन राज्यात सध्या शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पाहायला मिळतंय. मात्र, याबाबत बोलताना अंतराराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी मोठं वक्तव्य केलंय. महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपमधील तणाव हा राजकारणाचा भाग आहे. हे सगळं चालू राहतं. ते घरात एकत्र जेवणही करु शकतात, असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलंय. तसंच देशातील विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांचा मुद्दा उचलून धरावा, देश हिताचा मुद्दा उचलेल त्या पक्षाचा आम्ही उदो उदो करु, असं तोगडिया यांनी म्हटलंय.

भारताला तालिबानचा सर्वात मोठा धोका आहे. कारण तालिबानी विचाराचं केंद्र भारत आहेत. तालिबानला तोंड देण्यासाठी भारत सरकारने तबलिकी जमात, दारुल देवबंद, जमायते उलेमा हिंद या संघटनेवर बंदी घालायला हवी. नागपुरातील मदरशांमध्ये मौलवी तबलिकी जमातचं प्रशिक्षण देत आहेत. अफगाणिस्तानातील एकाही मुस्लिमाला भारतात स्थान नको, फक्त शिखांना राहू द्या, अशी मागणीही त्यांनी केलीय. राम मंदिराचे हिरो तिनच आहेत ते म्हणजे अशोक सिंघल, बाळासाहेब ठाकरे आणि कल्याण सिंग, असंही तोगडिया यांनी म्हटलंय.

See also  मुंबईतील आग प्रकरणी राज्य सरकार आणि मोदी सरकार यांनी एकत्र येऊन घेतला मोठा निर्णय