काबूल विमानतळाच्या गेटवर बॉम्बस्फोट, ६० जणांचा मृत्यू

0
slider_4552

काबूल :

अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये असलेल्या हमीद करझई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दहशतवादी हल्ल्याचा धोका वर्तवण्यात आला होता.

हाच धोका दुर्देवाने खरा ठरला आहे. या दुर्घटनेत किमान 60 जण या स्फोटात ठार झाले आहेत आणि अनेक जण गंभीर जखमी झाल्याची भीती वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयानेदेखील या घटनेला दुजोरा दिला आहे. ‘काबूल विमानतळाच्या गेटवर बॉम्बस्फोट झाला आहे. आतापर्यंत जखमी आणि मृतकांची संख्या समोर आलेली नाही. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जारी केली जाईल’, असं अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे सचिव जॉन किर्बी यांनी सांगितलं आहे. दरम्यान, या बॉम्बस्फोटाची जबाबदारी आता आयसीस या दहशतवादी संघटनेने घेतल्याची माहिती समोर आली आहे.

परिसरात प्रचंड खळबळ

काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य गेटवर ही घटना घडली. घटनेनंतर विमानतळ आणि आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. लोकांची प्रचंड धावपळ सुरु आहे. विशेष म्हणजे घटनेच्या काही वेळापूर्वीच विमानतळावरुन उड्डाण घेतलेल्या इराणच्या एका लष्करी विमानावर गोळीबार करण्यात आला होता. पण सुदैवाने विमानातील कुणालाही नुकसान पोहोचलं नव्हतं. दुसरीकडे हल्ल्यानंतर आता स्थानिक नागरिकांकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे.

अफगाणिस्तान देश 15 ऑगस्टपासून तालिबानने ताब्यात घेतला आहे. तेव्हापासून जगभरातील अनेक देशांकडून अफगाणिस्तानात अडकलेल्या त्यांच्या नागरिकांचं रेसक्यू मिशन सुरु आहे. आतापर्यंत अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना सुखरुप अफगाणिस्तानातून आपल्या मायदेशी घरी नेलं आहे. पण काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळावरील तणाव हा दिवसेंदिवस वाढत आहे. तिथे गर्दिमुळे चेंगराचेंगरीच्या घटना समोर येत होत्या. त्यानंतर गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. आता थेट बॉम्बस्फोटची माहिती समोर आली आहे.

See also  रियल-टाइम ग्रॉस सेटलमेंट (RTGS) आठवड्यातून सात दिवस उपलब्ध करण्याचा प्रस्ताव : रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास