अमेनिटी स्पेस भाड्याने देणे निर्णया विरोधात बाणेर बालेवाडी राष्ट्रवादीचे आंदोलन.

0
slider_4552

बाणेर :

बाणेर येथे प्रभाग क्रमांक ९ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अमेनिटी स्पेस भाड्याने देण्याच्या पूणे महानगरपालिकेच्या सत्ताधार्‍यांच्या निर्णयाविरुद्ध जोरदार आंदोलन करण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर चे उपाध्यक्ष डॉ. सागर बालवडकर यांनी आंदोलना बद्दल माहिती देताना सांगितले की, पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्यांनी या सत्तेचा गैरवापर करून नागरिकांच्या हितासाठी आवश्यक असणारा ॲमिनिटी स्पेस भाडे तत्त्वाने देण्याचा ठराव आणला आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या हितास बाधा पोहोचणारा हा निर्णय आहे. या ॲमिनिटी स्पेस चा उपयोग नागरिकांच्या हितासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविणे करता होऊ शकतो. परंतु तोच ॲमिनिटी स्पेस विकासाच्या नावाखाली भाडेतत्वावर देणे गैर आहे. जर विकासासाठी पैसे हवेत तर मग नागरिकांचा लाखो रुपयांचा जमा होणारे टॅक्स कुठे जातो, असा सवाल त्यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या ठरावास विरोध असून वेळप्रसंगी कोर्टात जाण्याची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी प्रभाग क्रमांक 9 चे अध्यक्ष विशाल विधाते, प्रा. रूपाली बालवडकर, विविध सोसायटीतील सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी यांनी तीव्र शब्दात ॲमिनिटी स्पेस भाडेतत्त्वावर देण्यास विरोध दर्शविला. येणार्‍या पुढच्या पिढीसाठी खेळायला फिरायला मोकळा श्वास घ्यायला जागा शिल्लक राहू द्या अशा शब्दात सर्वांनी निषेध केला.

यावेळी डॉ. सागर बालवडकर, विशाल विधाते, नितीन कळमकर, समीर चांदेरे, प्रा. रूपाली बालवडकर, पुनम विधाते, राखी श्रीराव, मनोज बालवडकर, अर्जुन ननवरे, माणिक गांधीले, तसेच विविध सोसायट्यांमधील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी कार्यकर्त्या, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  बाणेर ग्रामदैवत भैरवनाथ देवस्थान उत्सव कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द....