विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी.

0
slider_4552

परिवहनमंत्री परब असलेल्या खात्यात एसटी महामंडळात ९० हजार पेक्षा जास्त एसटी कर्मचारी अनियमित वेतनामुळे एस. टी. कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय प्रचंड आर्थिक आणि मानसिक तणावात आहेत. याप्रकरणी आज विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहले आहे.

भाजपनेते तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. त्यामध्ये त्यांनी म्हंटले आहे की, एस.टी. कर्मचार्‍यांचे अनियमित वेतन, एस.टी. महामंडळ कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक हालअपेष्टा, त्यातून एस.टी. कर्मचार्‍यांच्या होत असलेल्या आत्महत्या, यात तातडीने हस्तक्षेप करून त्यांना दिलासा देण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.

‘एस.टी. महामंडळातील कर्मचार्‍यांना नियमित वेतन मिळत नसल्याने अनेक कुटुंब प्रचंड आर्थिक संकटात आहेत. कुटुंबाचे अर्थचक्र संकटात सापडल्याने नाईलाजाने एस.टी. कर्मचार्‍यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणे सुरू केले आहे. अहमदपूर, तेल्हारा, शहादा, कंधार आणि साक्री अशा अनेक ठिकाणी एस.टी. कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

यापूर्वी गेल्यावर्षी सुद्धा जळगाव येथे वाहक मनोज चौधरी आणि रत्नागिरी येथे पांडुरंग गडदे या एसटी कर्मचार्‍यांच्या आत्महत्या झाल्यानंतर आपल्याशी पत्रव्यवहार केला होता. नाशिक आणि इतरही भागात त्यानंतर आत्महत्यांचे सत्र सुरूच राहिले. धुळे जिल्ह्यातील साक्री येथे बेडसे या एसटी कर्मचार्‍याने आत्महत्या करताना लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत वेतन मिळत नसल्याने आत्महत्या करीत असल्याचे स्पष्टच लिहून ठेवले आहे. असे असताना परिस्थिती नीट न हाताळता संताप व्यक्त करणार्‍या त्यांच्या संतप्त नातेवाईकांविरूद्धच पोलिसांनी गुन्हे दाखल केले. या घटनेने राज्यभरात एसटी कर्मचार्‍यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

‘माझी आपल्याला विनंती आहे की, एसटी कर्मचार्‍यांच्या या व्यथांकडे तातडीने हस्तक्षेप करीत आपण लक्ष द्यावे आणि वेतनाच्या समस्येवर तोडगा काढावा आणि राज्यभरातील या कर्मचार्‍यांना दिलासा द्यावा, असे फडणवीसांनी पत्रात म्हंटले आहे.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1432281758985175040?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1432281758985175040%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

See also  भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जळीत प्रकरणाच्या चौकशीसाठी समितीची नेमणुक.