रोहन कोकाटे यांनी सेवाभावी उपक्रमांनी वाढदिवस केला साजरा.

0
slider_4552

पाषाण :

भाजपा युवा मोर्चा कोथरुड सरचिटणीस व कृष्णगंगा सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन कोकाटे यांनी वाढदिवशी पाषाण सुतारवाडी दिव्यांग नागरिकांना धान्य वाटप केले व स्मार्ट आधार कार्ड, पॅन कार्ड, शॉप पॅक, आधार उद्योग मोफत काढुन दिले. जवळ पास ८०० लोकांनी या मध्ये सहभाग नोंदवून उस्फूर्त प्रतिसाद दिला.

पाषाण परीसरात विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र बापु मानकर, कोथरुड मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीत जोशी यांनी केले. नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले व कौतुक केलं.

याबद्दल माहिती देताना रोहन कोकाटे यांनी सांगितले की भाजपाने राबवलेल्या ‘सेवा ही संघटन’ या उपक्रमा अंतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे वाढदिवस साजरा करताना तो साधेपणाने सामाजिक उपक्रमातून साजरा केला असुन गरजू लोकांची सेवा करण्याच्या हेतूने सामाजिक उपक्रम राबविले आहे

दिव्यांग नागरिकांना धान्य वाटप कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शन प्रदिप कोकाटे व रघुनाथ तिखे यांनी केले. या वेळी उपाध्यक्ष राहुल कोकाटे, भाजपयुमो कोथरुड अध्यक्ष दुष्यंत मोहोळ, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, कालिदास कोकाटे, शिवाजी कोकाटे, संदीप कोकाटे, रोहिदास कोकाटे, सरचिटणीस दिपक पवार, निलेश सोनावणे, ऋषींकेश बराटे, संपर्क प्रमुख स्वप्निल राजिवडे, देवेंद्र जाधव व कोकाटे तालीम मंडळ ट्रस्ट व कृष्णगंगा सोशल फाऊंडेशन, युवा मोर्चा सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

See also  कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र बालेवाडी-पुणे येथे.