औंध :
औंध येथील महानगरपालिकेच्या इंदिरा गांधी शाळेमध्ये खाजगी सुरू असलेल्या कलमाडी इंग्लिश मीडियम स्कूल शाळेचा अवैद्य रित्या वापरत असलेल्या वर्गखोल्या टेरेस पालिकेने ताब्यात घेत कारवाई केली. यावेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून एडवोकेट मधुकर मुसळे यांनी गेली 17 वर्ष या शाळेचे भाडे कोण खात होते असा सवाल उपस्थित केला.
तीन वर्षाच्या प्रयत्ना नंतर अखेर औंध येथील कलमाडी शाळेच्या बेकायदेशीर कब्जातून पुणे मनपाच्या इंदिरा गांधी शाळेच्या दोन मजल्यासह दहा हजार चौरस फूट जागा ताब्यात घेतल. औंध येथील कलमाडी शाळेने गेली 17 वर्षा पासून कुठलाही करार नसतानी, कायदेशीररीत्या कुठलाही व काहीही संबंध नसतानी बेकायदेशीरपणे घुसखोरी करून पुणे महापालिकेच्या इंदिरा गांधी शाळेचे दोन मजले, टेरेससह अंदाजे दहा हजार चौरस फूट जागा बळकावली होती.
याउलट जागा उपलब्ध नसल्याने या शाळेतील अर्धे विद्यार्थी बाकावर बसायचे तर अर्धे विद्यार्थी त्यांच्या पायाजवळ खाली जमिनीवर बसायचे.ॲड मधुकर मुसळे व नगरसेविका अर्चना मुसळे यांच्या ही बाब लक्षात आली व त्यांनी तातडीने आयुक्तांकडे याबाबत तक्रार करून ही जागा ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही करण्यासाठी सतत पाठपुरावा केला.
कुठल्याही दबावाला व प्रलोभनांना बळी न पडता गोरगरीब विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढा देत पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभांमध्ये नगरसेविका अर्चना मुसळे यांनी प्रशासनाला फैलावर घेतले परिणामी त्यानंतर या शाळेच्या अकरापैकी सात खोल्या प्रशासनाने ताब्यात घेतल्या होत्या, परंतु तांत्रिक मुद्द्याच्या आधारे ही शाळा याविरुद्ध उच्च न्यायालयात गेली तरीसुद्धा ॲड मधुकर मुसळे व अर्चना मुसळे यांनी महापालिकेच्या कायदे विभागाच्या वकिलासह स्वखर्चातून या शाळेच्या पालकांच्या वतीने खाजगी वकील सुद्धा उच्च न्यायालयात उभे करून, या संस्थेच्या कब्जातून अकरा खोल्या व त्यावरील टेरेस असे एकूण दहा हजार चौरस फूट बांधकाम अखेर ताब्यात घेतले. त्याच बरोबर या शाळेकडून बेकायदेशीरपणे जागा वापरल्याबद्दल 65 लाख रुपये वसूल केले.
नगरसेविका अर्चना मधुकर मुसळे यांनी सांगीतले-पूर्वीच्या लोकप्रतिनिधी च्या मदतीने धनदांडग्यां संस्थेने गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी असलेली औंध मधील इंदिरा गांधी मनपा शाळेची जागा १७ वर्ष बळकावली होती त्या विरुद्ध तीन वर्ष संघर्ष करून या संस्थेकडून बेकायदेशीरपणे जागा वापराबद्दल 65 लाख रुपये वसूल करून अखेर ती जागा महापालिकेच्या ताब्यात घेतली. यासाठी आम्ही स्वखर्चाने मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वतीने उच्च न्यायालयात वकील सुद्धा दिले होते.
महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जागा नसल्यामुळे अर्धे विद्यार्थी बाकड्यावर तर अर्धे विद्यार्थी त्यांच्या पायाजवळ जमिनीवर बसत होते त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे काम आम्ही केले आहे. मनपाची ही शाळा पुणे शहरात उत्कृष्ट शाळा म्हणून उदयाला आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.