बाणेर :
भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमय्या यांचा स्वागत समारंभ भाजप ओबीसी मोर्चा महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रल्हाद सायकर आणि औंध प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेविका स्वप्नाली सायकर. यांच्या वतीने बाणेर येथे आयोजित करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सोमवारी सायंकाळी बाणेर येथे पत्रकार परिषदेत ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड पोलीस ठाण्यात तिसरा घोटाळ्यासंदर्भात गुन्हा दाखल करणार असल्याचे सांगितले.
पुढे म्हणाले, माझ्यावर कोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदी घालण्यात आली होती. ती हटविण्यात आल्याचे तेथील जिल्हाधिकारी यांनी मला कळवले आहे. या बंदीला मी घाबरत नव्हतो त्यामुळेच उद्या तिथे जाणार आहे. मुश्रीफ यांचे विरुद्ध पहिला दुसरा आणि तिसरा असे तीन घोटाळे असून त्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी करणार आहे.
कोल्हापूरला मंगळवार सकाळी अंबाबाई चे दर्शन घेऊन मी दुपारी साडेबारा वाजता मुरगूड पोलिस ठाण्यात जाणार आहे. या घोटाळ्यांमध्ये ठाकरे सरकारमधील बारा मंत्रालय यांचा संबंध आहे. मात्र त्यासंदर्भात आत्ता मी सविस्तर बोलणार नाही. मंत्र्यांविरुद्ध तक्रार केली की ते गायब होतात किंवा रुग्णालयात दाखल होतात असे सध्याचे चित्र असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले. काही दिवसांनी ठाकरे यांचे सर्व मंत्री हॉस्पिटल मध्ये दाखल होणार काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ते म्हणाले अनिल देशमुख गायब, प्रताप सरनाईक गायब, असे सर्वजण पळून जात आहे. मात्र मी हसन मुश्रीफ यांना सोडणार नाही. त्यांच्यावर पूर्ण कारवाई होईपर्यंत मी पाठपुरावा करीन. आनंद अडसूळ यांचे विरुद्ध 900 कोटी रुपयांचा गैरव्यवहार असल्याचे सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारात स्पष्ट झाले त्यांच्याविरुद्ध राज्य सरकारने कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी किरीट सोमय्या यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टीचे प्रल्हाद सायकर यांनी तलवार म्हणून जी भेट दिली ती कर्तव्याची जाणीव करून देणारी भेट आहे. ह्याच तलवारीने आपण सर्वजण मिळून भ्रष्टाचाराचा वध करू महाराष्ट्राला भ्रष्टाचार मुक्त करू असे त्यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री म्हणतात भ्रष्टाचार मुक्त भारत तर मुख्यमंत्री भ्रष्टाचार युक्त महाराष्ट्र म्हणतात. अगोदर भ्रष्टाचारास सापडलेले प्रत्येक नेते गायब व्हायचे आता प्रत्येक भ्रष्टाचारी नेते आजारी पडतात. ठाकरे सरकारचा पापाचा घडा भरलेला आहे तो फोडून भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करू असे ते म्हणाले.
या वेळी भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेविका ज्योती कळमकर, संदीप खर्डेकर, गणेश कळमकर, पुनीत जोशी, लहू बालवडकर, सहकार आघाडीचे प्रभारी प्रकाश बालवडकर, सचिन पाषाणकर, सचिन दळवी, उमा गाडगीळ, नगरसेवक दीपक पोटे, स्वरूपा शिर्के, सुप्रीम चोंधे, गणेश घोष, दत्ता खाडे, राजेंद्र येणपुरे, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रभाग क्रमांक 9 भाजपच्या वतीने मतदान नोंदणी मध्ये चार ते साडेचार हजार बोगस मतदान झाल्याबद्दल त्याचे निवेदन किरीट सोमय्या यांना देण्यात आले व ते कसे रोखता येईल यासाठी मार्गदर्शन करण्याची विनंती निवेदना द्वारे करण्यात आली.