पाषाण सुतारवाडी तळ्याजवळ पुन्हा आढळला गवा!!

0
slider_4552

पाषाण :

सुतारवाडी जवळील तलावाजवळ बावधन नजिक आज सकाळी बावधन एचईएमआरएल भिंतीलगत नागरिकांनी गवा पाहिला असून या ठिकाणी वन विभागाचे अधिकारी व पोलिस उपस्थित आहेत.

एचईएमआरएल व महामार्ग मध्ये असलेल्या जागेमध्ये हा गवा नागरिकांनी फिरताना पाहिला. या गवाला कोणत्या पद्धतीने हाताळता येईल याची पाहणी करून नियोजन करण्याचे काम सुरू आहे.

गवा आढळला त्याला पकडण्यासाठी वन विभागाचे पथक व पोलिस घटनास्थळी पोहोचले आहेत. या महिन्यात दुसऱ्यांदा पुण्यात गव्याचे दर्शन झाले आहे. दोन आठवड्यापूर्वी कोथरूड परिसरात गवा आढळला होता परंतु त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. प्रशासनाने नागरिकांना खबरदारी साठी घटनास्थळी नागरिकांनी गर्दी करू नये असे आव्हान केले आहे. वनविभागाची रेस्क्यू की टीम आली असून गव्यास सुरक्षित पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार गवा पकडण्यापेक्षा  एच ई एम आर एल च्या जंगलात हाकलून लावण्यात यावा त्यामुळे तो त्या जंगलात सुरक्षित राहील.

See also  प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाचा वापर करावा : चंद्रकांत पाटील