बालेवाडी :
बालेवाडी येथील रॉयल रनभूमी येथे या वर्षीची भव्य फुटबॉल स्पर्धा अर्थात मान्सून सॉकर फेस्ट 2021 दिनांक 3 ऑक्टोबर रोजी पार पडली. जोशात आणि जल्लोषात पार पडलेल्या या भव्य फुटबॉल स्पर्धेमध्ये तब्बल 60 संघांनी आपला सहभाग नोंदवला. तीन दिवस चाललेल्या या अटीतटीच्या लढतीमधे चुरस पाहायला मिळाली.
या स्पर्धेमधे मुलांच्या संघासोबतच मुलींच्या संघाचा सहभाग उल्लेखनीय होता.
यावेळी झालेल्या अंतिम लढतीत निरनिराळ्या गटातील खालील संघ विजेते ठरले.
मुलांचा खुला गट :
विजेता संघ – ऑरेंज आर्मी
उपविजेता संघ – सॉकरहोलिक बटर सेव्हन
मुलींचा खुला गट :
विजेता संघ – जश युनाइटेड
उपविजेता संघ – गो स्पोर्ट्स
३० वर्षा वरील संघ :
विजेता संघ – अकात्सुकी
उपविजेता संघ – घाना
११ वर्षा खालील संघ :
विजेता संघ – मॅथ्यूज् फ़ुटबॉल अकॅडमी
उपविजेता संघ – डियागो जुनिअर
तृतीय क्रमांक – गेम ऑफ गॉल्स
उत्कृष्ठ शिस्तबद्ध संघ :
ग्रीन बॉक्स चेतक फूटबॉल अकॅडमी
बालेवाडी येथील रॉयल रनभूमी येथे आयोजित या भव्य मान्सून सॉकर फेस्ट च्या समारोपाच्या कार्यक्रमात
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ महाराष्ट्र क्रीडा प्रबोधिनी चे कोच धीरज मिश्रा सर, सुनील इखणकर, लहू बालवडकर सोशल वेलफेअर चे संस्थापक लहू गजानन बालवडकर, प्रफुल इखणकर, महेंद्र काळे, यु.के.एम.एफ.सी कोथरूड चे मा. कुलकर्णी, मनोज बालवडकर, किरण बालवडकर, शुभम बालवडकर, कृष्णा बालवडकर, संदीप तापकीर, विनोद बालवडकर, सुवर्णा इखणकर, विद्या बालवडकर, अश्विनी बालवडकर, प्रियंका बालवडकर, स्वाती काळे व इतर मान्यवर या वेळी उपस्थित होते.
या स्पर्धेच्या काळात कोणत्याही जखमी खेळाडूला त्वरित उपचार मिळावे यासाठी लहू बालवडकर सोशल वेलफेअर च्या वतीने आद्ययावत रुग्णवाहिका तसेच अनुभवी डॉक्टर अशी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या स्पर्धेला लहू बालवडकर सोशल वेलफेअर, राईट फाउंडेशन, यु.के.एम.एफ.सी कोथरूड व ब्लेझ ओलंम्पिया हे या स्पर्धेला मुख्य प्रायोजक म्हणून लाभले होते.