प्रकाश बालवडकर यांच्या सहकार्याने बालेवाडी येथे मोफत लसीकरण मोहीम

0
slider_4552

बालेवाडी :

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजून पुर्ण पणे कोरोना संपलेला नाही म्हणुनच कोरोना विरूद्ध लढण्यासाठी लसीकरण करुण घेण्याशिवाय पर्याय नाही. परंतु अल्प उत्पन्न धारक नागरिकांना लसीकरण करून घेणे शक्य होत नाही. म्हणुनच प्रभागातील अल्प उत्पन्न धारक नागरिकांसाठी भाजपा सहकार आघाडीचे पुणे शहर प्रभारी प्रकाश बालवडकर आणि मयुरी प्रणव बालवडकर यांच्या सहकार्याने मोफत लसीकरण मोहीम राबवली आहे.

शाश्वत हॉस्पिटल, लोकविकास मंडळ, युनिटी वूमेन्स क्लब, मोरया फिटेनस, सेवा आरोग्य, बाळासाहेब देवरस पॉलीक्लिनिक, पुणे वैद्यकीय सेवा प्रतिष्ठान,सिरम इन्स्टिट्यूट ऑफ पुणे, पीपीसीआर या सर्व संस्थांच्या माध्यमातुन अल्प उत्पन्न धारक नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम आयोजित केली आहे.

या बद्दल माहिती देताना प्रकाश बालवडकर यांनी सांगितले की, लसीकरणाची गरज लक्षात घेऊन अल्प उत्पन्न धारक नागरिकांसाठी मोफत लसीकरण मोहीम राबविली आहे. नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत लसीकरण करून घेतले याचे समाधान प्रकाश बालवडकर यांनी व्यक्त केले. जास्तीत जास्त नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेवून लसीकरण करून लसवंत व्हावे असे आव्हान त्यांनी केले.

यावेळी मयुरी प्रणव बालवडकर यांनी लसीकरण करण्यास येणाऱ्या नागरिकांचे स्वागत केले. आणि प्रत्यकाच्या तब्येतीची विचारपूस केली.

 

See also  प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी अग्रस्थानी असते महिला : चित्रा वाघ