सोमेश्वरवाडी :
दिवाळी म्हटली कि उत्साहाचा आनंदाचा सण. लहान मुलांना तर दिवाळी आली की फारच उत्साह संचारतो. प्रत्येक मुलाला वाटते की आपल्या दरवाजाच्या मध्ये छानसा आकाश कंदील असावा. त्याच्या प्रकाशामध्ये आपलं घर उजळून निघावे. पण मग हाच आकाश कंदील जर या मुलांनी स्वतः बनवला तर. छानशी संकल्पना घेऊन माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी आकाश कंदील बनवण्याची मोफत कार्यशाळा शनिवार दि. ३०/ १०/ २०२१ रोजी आयोजित केली आहे.




सनी निम्हण यांनी याबद्दलची माहिती देताना सांगितले की, लहान मुलांचा उत्साह द्विगुणित व्हावा, त्यांच्या अंगातील कला गुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही आपल्या मुलांसाठी या दिवाळीत घेऊन आलो आहोत आकाशकंदील बनविण्याची मोफत कार्यशाळा. कलात्मक आकाशकंदील स्वत: कसे तयार करायचे, याचे मार्गदर्शन या कार्यशाळेत मिळणार आहे. हे आकाशकंदील बनविण्यासाठी आवश्यक सर्व साधन हे आम्ही आपणांस पुरविणार आहोत. आपल्या मुलांनीच बनविणे सुंदर आकाश कंदील या दिवाळीला आपल्याला आपल्या घरी लावता येणार आहे. म्हणूनच या कार्यशाळेत अवश्य सहभागी व्हा व आपल्या मित्र परिवारालाही सांगा असे आव्हान करत आहे.
आकाशकंदील बनविण्याची मोफत कार्यशाळा शनिवार दि. ३०/ १०/ २०२१ रोजी सायंकाळी ४ : ०० ते ६ : ०० या वेळेत संजय महादेव निम्हण ग्रामसंस्कृती उद्यान सोमेश्वरवाडी, पाषाण येथे होणार आहे. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना मोफत आकाश कंदील बनविण्याचे साहित्य मिळणार आहे.








