साफसफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी जीवन चाकणकर यांच्याकडून मिठाई वाटप

0
slider_4552

बाणेर :

दिवाळीचे निमित्त साधून बाणेर येथे पुणे शहर जिल्हा  काँग्रेस कमिटीचे सचिव जीवन चाकणकर यांच्या वतीने परिसरातील महानगरपालिकेच्या वतीने साफसफाई करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना करिता मिठाईचे वाटप जीवन चाकणकर जनसंपर्क कार्यालय बाणेर येथे करण्यात आले.

जीवन चाकणकर यांनी मॅकन्यूजला माहिती देताना सांगितले की, परिसरातील सर्व भाग स्वच्छ व्हावा म्हणून सदैव कार्यरत असणारे सफाई कामगार त्यांचे काम फार मोलाचे आहेत.कोरोना काळातदेखील आपला जीव धोक्यात घालून सर्वांनी आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे काम केले. त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून अशा साफ सफाई कामगारांची दिवाळी गोड करण्याच्या हेतूने त्यांच्याकरिता मिठाईचे वाटप करत आहे.

यावेळी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी संघटक सचिव युवानेते जीवन चाकणकर, महेंद्र गंगावणे, लक्ष्मण पवार, विजुभाऊ सायकर, संदीप कळमकर, नितीन अल्लाट, दीपक कुंभार, अमोल कळमकर आदि उपस्थित होते.

See also  शिवसैनिकांच्या वतीने नवनियुक्त संपर्क प्रमुख व सहसंपर्कप्रमुख यांचा सन्मान