दिवेआगर :
पर्यटन व्यवसाय कोरोणाच्या कालावधीनंतर पुन्हा उभारी येऊ लागला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटक कोकणाकडे वळत असून कोकणातील व्यवसायिक देखील यासाठी पुन्हा सज्ज झाले आहेत. दिवेआगरच्या समुद्रकिनारी डॉल्फिनचा स्वच्छन्द वावर पर्यटकांना पहायला मिळत आहे.
कोकणामध्ये दिवेआगार हे पुण्यातील पर्यटकांचे आवडते ठिकाण. कोरोणा कालावधीनंतर पर्यटनासाठी खुले झाल्यानंतर पर्यटकांची गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. यामुळे गेले दोन वर्ष अडचणीत सापडलेले समुद्रातील फेरी व खेळ बग्गी वाले यांसाठी ही आनंदाची बाब असली आहे. मागील दोन वर्षात आलेली वादळे कोरोना कालावधी यामुळे झालेले नुकसान भरून काढण्याची संधी या व्यावसायिकांना मिळत असली तरी शासनाने कोकणामध्ये पर्यटन विकासासाठी अधिकाधिक प्रयत्न करावा. तसेच रस्त्यांची दुरुस्ती करावी व पर्यटक कोकणाकडे येण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी कोकणातील व्यावसायिक करत आहेत.
दिवेआगार येथे समुद्रातील खेळ व बोटिंग चा व्यवसाय करणारे सोमैया बोटिंग आणि वॉटर स्पोर्टस्चे मालक वसीम भाई फकझी म्हणाले, काही दिवस कोकणातील व्यवसाय हा पुन्हा नव्याने उभारी घेत आहे. परंतु कोकणातील वादळे व कोरोणा यामुळे सर्वच व्यवसायिकांची अडचण निर्माण झाली आहे. कोकणामध्ये नव्याने व्यवसाय सुरू करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. तसेच पर्यटकांना महत्त्वाचे आकर्षण म्हणजे याठिकाणी डॉल्फिन पहायला मिळत आहे. डॉल्फिन साठी सध्या हा कालावधी महत्त्वाचा असल्याने वारंवार डॉल्फिनचे कोकणामध्ये दर्शन होत आहे. नागरिकांसाठी डॉल्फिन पाहण्यासाठी महत्त्वाची संधी सध्या अनेकांना मिळत आहे. अनेक नागरिक डॉल्फिन पाहण्यासाठी समुद्रकिनारी गर्दी करत असून कोकणातील निसर्गाचा आनंद देखील घेताना पहायला मिळत आहेत.