लोकमत “स्वर चैतन्य” दिवाळी पहाट कार्यक्रम एसकेपी कॅम्पस मध्ये उत्साहात पार

0
slider_4552

बालेवाडी :

दिवाळी म्हटले की सण उत्साहाचा आनंदाचा जल्लोषाचा हा उत्साह द्विगुणीत करण्याचे काम डॅा. सागर बालवडकर यांनी आज “लोकमत स्वर चैतन्य दिवाळी पहाट” या कार्यक्रमाचे आयोजन करून केले. बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना या कार्यक्रमात राकेश चौरसिया व कौशिकी चक्रवर्ती यांच्यातील अनोखी जुगलबंदी पहावयास मिळाली. आणि त्यांच्या जुगलबंदी ला रसिक प्रेक्षकांची तेवढीच जोरदार दाद मिळाली.

या वेळी पद्मश्री विजय घाटे,अजय जोगळेकर व ओजस आधिया या कलाकारांनी आपल्या कला साधर केल्या. कलेची अनोखी अदा या कार्यक्रमाच्या निमित्ताने रसिकांना पाहायला आणि ऐकायला मिळाली.

यावेळी बोलताना डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले की सुस, म्हाळुंगे, बाणेर, बालेवाडी या उपनगराची महाराष्ट्रात क्रीडानगरी म्हणून ओळख आहे. क्रीडानगरी सोबतच सांस्कृतिक उपनगर म्हणून या परिसराची ओळख निर्माण व्हावी त्यासाठी आमचा हा प्रयत्न आहे. उपस्थितांचे आभार यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले

याप्रसंगी नाम फाऊंडेशनचे प्रमुख व प्रसिद्ध कलाकार नाना पाटेकर, लोकमत समुहाचे संपादक विजय बाविस्कर, ओमप्रकाश रांका, कृष्णकुमार गोयल, माजी आमदार विजय गव्हाणे, नगरसेवक बाबुराव चांदेरे, डॅा.राजेश देशपांडे, उद्योजक अरुण खंडेलवाल अदि मान्यवर उपस्थित होते.

See also  सूस मधील नागरिकांनी घेतला दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद...!