अद्भुत “चैतन्य स्पर्श” सोहळा लहू बालवडकर सोशल वेलफेअर च्या वतीने बालेवाडीत.

0
slider_4552

बालेवाडी :

सामाजिक शैक्षणिक राजकीय क्रिडा आणि सांप्रदायिक वातावरण असणाऱ्या बाणेर, बालेवाडी, सुस, म्हाळुंगे या परिसरातील नागरिकांसाठी भक्तीचा सागर एकाच ठिकाणी पहायला मिळेल. अद्भुत “चैतन्य स्पर्श” सोहळा लहू बालवडकर सोशल वेलफेअर च्या वतीने बालेवाडी येथील गेनबा सोपानराव मोझे कॉलेजच्या मैदानात भक्तांसाठी पादुका दर्शनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असून सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत या कार्यक्रमाचा नागरिकांना लाभ घेता येणार आहे.

यामध्ये प्राचिन ‘श्री दत्ता सुवर्ण मूर्ती,’ श्री सायंदेव दत्तश्रेत्र कडगंची येथील ‘श्री दत्त गुरू करुणा पादुका,’ श्री क्षेत्र औदुंबर येथिल ‘श्री नृसिंह सरस्वती नारायण पादुका,’ श्री गुरू हैबतराव बाब यांनी नेर्लेकर घराण्याला दिलेल्या ‘श्री ज्ञानेश्वर महाराज पादुका,’ श्री साई बाबा यांनी सन १८९८ साली निमोणकर घराण्याला दिलेल्या ‘श्री साई बाबा पादुका,’ परम स्वामी भक्त श्रीमती सुंदराबाई काडगावकर यांना महाराजांनी सन १८६६ साली दिलेल्या ‘श्री स्वामी समर्थ महाराज पादुका,’ कै. भगवानराव जानराव देशमुख यांना श्री गजानन महाराज यांनि सन १९०७ साली दिलेल्या ‘श्री गजानन महाराज पादुका,’ श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड सावरगाव बीड येथील संजीवनी समाधी ‘श्री मच्छिंद्रनात महाराज पादुका,’ समर्थ भक्त मोहन बुवा रामदासी खादगाव यांचे घराण्यातील श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रासादिक ‘श्री समर्थ रामदास स्वामी पादुका,’ श्रीमद वासुदेवानंद सरस्वती (टेंबे) स्वामी महाराज ‘श्री परमहंस परिव्राजताचार्य पादुका,’ प.पु. रधुनाथ हरिभाऊ कडलासकर (पेंटर काक) यांना सन १९४६ साली शंकर महाराजांनी दिलेल्या प्रासादिक ‘श्री शंकर महाराज पादुका’ आणि संस्थापक आचार्य-आंतरराष्टीय कृष्णभवनामृत संघ भक्तिवेंदांत स्वामी प्रभुपाद कृष्णकृपामूर्ती ‘श्री श्रीमद ए. सी. पादुका’ या १२ पादुकांचा समावेश करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाची माहिती देताना भाजपा युवा नेते लहू बालवडकर यांनी मॅकन्यूज ला सांगितले की, मागील बऱ्याच काळापासून कोरोना मुळे सर्व मंदिरे बंद होती. आता कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने सर्व बंधने मुक्त झाली. म्हणून पुन्हा एकदा परिसरातील नागरिकांना भक्तिमय चैतन्याचा स्पर्श अनुभवता यावा या उदात्त हेतू मुळे “चैतन्य स्पर्श”हा अद्भुत आणि दिव्य सोहळा परिसरातील भाविकांसाठी भरविण्यात आला आहे. अशा या दिव्य सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या १२ शक्ती पिठांच्या पादुका एकत्रित दर्शनाकरिता उपलब्ध होणार आहे. ‘याची देही याची डोळा’ हा महादर्शन सोहळा सर्व भक्तांनी आवर्जून उपस्थित राहुन भक्तिमय वातावरणात सहभागी व्हावे व महाप्रसादाचा लाभ अवश्य घ्यावा असे आव्हान करत आहे.

See also  सचिन दळवी आयोजित किल्ले स्पर्धाचे बक्षीस वितरण व शेतकरी आठवडे बाजार उद्घाटन उत्साहात पार

यावेळी कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे विविध नेते आवर्जून उपस्थित राहणार आहेत