पाषाण :
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त 101 रोपांचे वृक्षारोपण सोहळा संतोष तोंडे कोथरूड विधानसभा विभाग प्रमुख आणि रूपाली संतोष तोंडे यांच्यावतीनेआणि वसुंधरा अभियानाच्या सहयोगाने शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे यांच्या उपस्थितीत बाणेर पाषाण येथील तुकाई टेकडीवर संपन्न झाला.
यानिमित्ताने शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे यांनी संतोष तोंडे परिवाराचे कौतुक करताना सांगितले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार मनात घेऊन सामाजिक काम करताना एक वेगळ्या उत्साहात ते काम करत आहेत. आजचे वृक्षारोपण करत असताना पर्यावरणाचे संतुलन राखण्याचे काम या परीसरात होत आहे हे विशेष. पर्यावरण राखले तर आपले आरोग्य सुरक्षित राहील. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनात वृक्षारोपनाला खूप महत्त्व आहे.
या कार्यक्रमाची माहिती देताना संतोष तोंडे यांनी सांगितले की, शिवसेना म्हटलं की हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, ते विचार त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त वृक्षाचे रोपण करून सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. याप्रमाणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेचे विचार सर्वसामान्यांपर्यंत रुजविले त्या विचारांची पायामुळे वृक्षारोपण करून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी अपेक्षा आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे गजानन थरकुडे शहर प्रमुख, ज्येष्ठ शिवसैनिक लक्ष्मण दिघे, विजय दाभाडे, शोभा दाभाडे, रोहित लोंढे, मंगेश खळदकर, गणेश सुतार, वाल्मिक सुतार, अक्षय भालेराव, राजेश नाकरा, सुधांशू तोंडे, रुपेश कदम व वसुंधरा अभियान चे भुजबळ सर, संजय मुरकुटे, कृष्णा सदाकाळ, मोहन हिंगडे व वसुंधरा अभियान परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.