पुणे :
पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनलची आज बैठक झाली.
या बैठकीत पॅनलच्या मतदारसंघ निहाय अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व पक्षाचे वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच दिलीप वळसे पाटील, संग्राम थोपटे, संजय जगताप, रेवणनाथ दारवटकर, ज्ञानोबा दाभाडे यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
अ – वर्गातील मतदार संघ आणि उमेदवार
अजित अनंतराव पवार – बारामती मतदारसंघ (बिनविरोध)
दिलीप दत्तात्रय वळसे – आंबेगाव मतदारसंघ (बिनविरोध)
संग्राम अनंतराव थोपटे – भोर मतदारसंघ (बिनविरोध)
संजय चंद्रकांत जगताप – पुरंदर मतदारसंघ (बिनविरोध)
रेवणनाथ कृष्णाजी दारवटकर – वेल्हा मतदारसंघ (बिनविरोध)
ज्ञानोबा सावळेराम दाभाडे – मावळ मतदारसंघ (बिनविरोध)
दिलीप दत्तात्रय मोहिते – खेड मतदारसंघ
अशोक रावसाहेब पवार – शिरुर मतदारसंघ
रमेश किसनराव थोरात – दौंड मतदारसंघ
संजय शिवाजीराव काळे – जुन्नर मतदारसंघ
सुनिल काशिनाथ चांदेरे – मुळशी मतदारसंघ
रणजित बाबुराव निंबाळकर – इंदापूर मतदारसंघ
मैत्रीपूर्ण लढत – हवेली मतदारसंघ
ब वर्ग मतदार संघ
दत्तात्रय भरणे (इंदापूर)
क वर्ग मतदार संघ
सुरेश घुले (हवेली)
ड वर्ग मतदार संघ
दिगंबर दुर्गाडे (पुरंदर)
अनुसूचित जाती -जमाती
प्रविण शिंदे (हवेली)
इतर मागासवर्गीय मतदार संघ
संभाजी होळकर (बारामती)
विभक्त जाती व भटक्या जमाती मतदार संघ
दत्तात्रय येळे (बारामती)
महिला प्रतिनिधी
पुजा बुट्टेपाटील (जुन्नर)
निर्मला जागडे (वेल्हा)