पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मिळविले विजेतेपद

0
slider_4552

नांदेड :

नांदेड येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ कबड्डी स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम क्रमांक मिळविला. अतीशय अटीतटीच्या अंतिम सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 25 तर भारती विद्यापीठ 22 गुण मिळविले. अंतिम सामना सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठाने 3 गुणांनी विजय मिळवला. सावित्रीबाई फुले विद्यापीठाकडून प्रतिक्षा करेकर व निकिता पडवळ हिने उत्कृष्ट चढाया केल्या तर हर्षदा सोनावणे सिद्दि मराठे हिने उत्कृष्ट पकडी केल्या. पराभूत संघाकडून मंदिरा व गजमल यांनी अयशस्वी लढत दिली.

तत्पूर्वी उपांत्य फेरीचा सामना नागपुर विद्यापीठ विरुद्ध सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यामध्ये झाला. यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 37 गुण मिळविले नागपूर विद्यापीठाने 21 गुण मिळविले. सदर सामना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 16 गुणांनी जिंकला.

संघाच्या प्रशिक्षिका डॉ. विद्या पाठारे यांनी संघाचे कौतुक करताना सांगितले की, अतिशय नियोजनबद्द खेळ करत मुलींनी विजय खेचून आणला. चुरशीच्या लढतीत मुलींनी दाखविलेली चिकाटी आणि संयम कामास आला म्हणून विजय मिळविता आला. संघातील प्रत्येक खेळाडूने चांगले योगदान दिले.

See also  ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच टी२० विश्वचषकावर आपले कोरले नाव