बावधन :
बावधन-पाषाण-सुतारवाडी परिसरातील नागरिकांना नूतन वर्षातील सण-वार, शुभ मुहूर्त, यात्रा-उत्सव आणि जयंती-पुण्यतिथी यासंदर्भातील इत्यंभूत माहिती सहज उपलब्ध व्हावी या हेतूने सुर्यकांत भुंडे सोशल फाऊंडेशनच्या वतीने नूतन वर्ष २०२२ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, माजी महापौर प्रशांत जगताप यांच्या शुभहस्ते व मा.अध्यक्ष शिक्षण मंडळ प्रदीप धुमाळ, पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाला.
दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याची माहिती देताना युवानेते सूर्यकांत भुंडे म्हणाले की, दैनंदिन जीवनामध्ये दिनदर्शिके ला असलेले महत्त्व लक्षात घेता सर्व प्रकारची इत्यंभूत माहिती सहज उपलब्ध व्हावी या निर्मळ हेतूने परिसरातील सर्व नागरिकांना दिनदर्शिका उपलब्ध करून देणार आहोत. त्याचे प्रकाशन केले आहे. याच सोबत मकरसंक्रांतीचे औचित्य साधून सुर्यकांत भुंडे सोशल फाऊंडेशनच्या वतीने तिळगुळ वाटपाचा शुभारंभ देखील या वेळी करण्यात आला.
दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले की, सूर्यकांत भुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेली दिनदर्शिका नागरिकांना चांगल्या प्रकारची इत्यंभूत माहिती पुरविणारी आहे. चांगल्या प्रकारचे काम ते प्रभागांमध्ये करत असतात. विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच सहभाग असतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ते करत असलेल्या समाजोपयोगी कार्यक्रमाची पक्ष नेहमीच दखल घेत असतो.
या शुभप्रसंगी आझाद दगडे, पांडुरंग दगडे, सचिन शिंदे, योगेश सुतार, महेश सुतार, सतिश भुंडे, आशिष दगडे, किरण भुंडे, अशोक दगडे, प्रविण भुंडे, विशाल दगडे, विश्वास दगडे, सुजित भुंडे आदी मित्रपरिवार उपस्थित होता.