हळदी कुंकू कार्यक्रम हा एक प्रकारचा महिलांचा गौरवच : नगरसेविका ज्योती कळमकर

0
slider_4552

बाणेर :

नगरसेविका ज्योती कळमकर आणि श्रीनाथ सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 13 मधील बाणेर, सुस, महाळुंगे गावच्या महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित केला होता. यावेळी महिलांना वान म्हणून भेट वस्तू देण्यात आल्या.

हळदी-कुंकू समारंभाची माहिती देताना नगरसेविका ज्योती कळमकर यांनी सांगितले की, आपल्या संस्कृती मध्ये महिलांचे असलेले स्थान आणि हळदी कुंकवाचा मान महिलांचे महत्व विशद करत असतो. परिसरातील महिलांचा स्नेहबंध वाढावा. आपसात आपुलकी जपण्याचं काम करण्याकरिता हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आपल्याकडे हळदी कुंकवाला फार मोठे महत्व असून हळदीकुंकू समारंभ म्हणजे एक प्रकारे महिलांचा गौरवच आहे.

यावेळी गणेश जन्माचे औचित्य साधून नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळील गणेश मंदिरामध्ये गणपती बाप्पाची आरती घेण्यात आली. यावेळी नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक अमोल बालवडकर, सारिका मुरकुटे, प्रल्हाद सायकर पुणे शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर आणि परिसरातील बहुसंख्य महिला हळदी कुंकू समारंभा निमित्त उपस्थित होत्या.

See also  केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, पोंडीचेरी, आसाम मधील निवडणूक जाहीर.