सुरुवात सेनाभवनापासून केली आणि शेवट ईडी कार्यालयावर करणार : संजय राऊत

0
slider_4552

मुंबई :

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवनामध्ये महत्वाची पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा काल केली होती आणि त्यामुळेच राऊत काय बोलणार याची सर्वच राजकीय नेते मंडळींसह राज्यातील शिवसैनिक आणि सामान्य जनतेलाही उत्सुकता लागून होती आणि त्यानुसार आता राऊत पत्रकार परिषदेत बोलत असतानाच त्यांनी नी केंद्रीय यंत्रणावरती आरोप केले आहेत.

महाराष्ट्रावरती नव्हे कर देशावरती संकट-

राऊत यांनी पत्रकार परिषदेची सुरुवात करतानाच सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा आणि शरद पवारांचा मला फोन आला ते ही पत्रकार परिषद बघत आहेत आणि ते त्यांनी सांगितलं आहे की आप आगे बढो.. दरम्यान ते म्हणाले, ‘आज मला हेच सांगायच आहे की ‘महाराष्ट्र गां*ची अवलाद नाही. आम्ही कधीही झुकणार नाही.’ केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करताय ते फक्त महाराष्ट्रावरती नव्हे कर देशावरती संकट आहे. आणि भाजपला या यंत्रणांचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडायच आहे आणि यासाठीच त्यांचे प्रयत्न सुरु आहेत असल्याचा आरोप राऊतांनी यावेळी केला.

शेवट ईडी कार्यालयावर –

दरम्यान ते म्हणाले माझ्यावरती आणि माझ्या नातेवाईकांवरती पहाटे तीन, चार वाजता चौकशी करण्यासाठी तापास यंत्रणांची लोकं येतात. आणि त्याच वेळी भाजपचे लोकं ED ची लोकं कुठे पोहचणार हे सांगतात. याचा अर्थ ईडीचा गैरवापर सुरु आहे. आणि इतकच नव्हे तर माझा मित्र परिवारला बदनाम कारायच मुलांना फोन करायचं तुमच्या वडिलांना अटक करतील असला नालायकपणे भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात सुरु केला.’ असल्याचंही ते म्हणाले.

तसंच आजची ही पत्रकार परिषद ईडीच्या कार्यालयासमोरच (ED Office) घेणार होतो मात्र सुरुवात सेनाभवनापासून करावी आणि शेवट ईडी कार्यालयावर करावा असा विचार करुन आज इथे पत्रकार परिषद घेतल्याचंही ते म्हणाले.

See also  कोरेगाव भीमा येथील शौर्य दिन कार्यक्रम आयोजन व नियोजन यापुढे सामाजिक न्याय विभागामार्फत : धनंजय मुंडे