ठाणे :
69 व्या वरिष्ठ गट पुरुष/महिला राज्य निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या महिला गटाच्या अंतिम सामन्यांत पुणे जिल्ह्यांने मागील सलग १६ स्पर्धेत मिळविले १४ वे विजेतेपद तर पुरुष विभागात अहमदनगर जिल्ह्याने २४ वर्षांनी राज्य अजिंक्यपद पटकावले.
महिला विभगात सायली केरीपाळे आणि स्नेहल शिंदेच्या खेळाच्या जोरावर पुणे जिल्हा संघाचे 28-24 असा चार गुणांनी विजय मिळवून राज्य अजिंक्यपद पटकाविले. या सामन्याच्या अंतिम टप्प्यामध्ये पुणे जिल्हा पिछाडीवर पडलेला असताना सायली केरीपाळेने एकच चढाई चार गुण मिळवून सामन्यावर पकड मिळवली तिला स्नेहल शिंदेची चांगली साथ मिळाली. संघातील प्रत्येक खेळाडूचे चांगले योगदान आणि प्रशिक्षक योगेश यादव यांची रणनीती संघाला विजय मिळवून देण्यास उपयोगी ठरली.
पुरुष विभाग मुंबई शहर आणि अहमदनगर जिल्हा यांच्यात अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात निर्धारित वेळेत २५-२५ अशी बरोबरी झाल्या नंतर पाच पाच चढाया मधील देखील दोन्हीं संघात ६-६ अशी बरोबरी झाली. त्यानंतर नाणेफेक होवून नाणेफेक जिंकत अहमदनगर संघाने गोल्डन रेड मिळवली व या रेडवर बोनस गुण मिळवत २४ वर्षांनी राज्य अजिंक्यपद पटकावले.