बालेवाडी :
बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन आणि बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशन यांनी एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर आणि महिला आरोग्य विषयावर व्याख्याने आयोजित केली आहेत. ८ मार्चला सायंकाळी ४ वाजता हे शिबिर घेण्यात येईल. बालेवाडी येथील सर्व महिलांना याचा लाभ घेता येईल. कार्यक्रम निःशुल्क आहे.
यावेळी डॉ. प्रिया देशपांडे मासिक पाळी संबंधित समस्येवर तर डॉ. वृंदा थोरात त्वचा व केसांची काळजी यावर मार्गदर्शन करणार आहेत. नॉर्मल डिलिवरी बद्दल बेनिकेअर हाॅस्पिटल सांगणार आहे. जनरल चेकअप, बीएमआय , बीपी ,सीबीसी , शुगर , ईसीजी ( ५० वर्षे पेक्षा जास्त वय आणि बीपी असणारे) इत्यादी चाचण्या केल्या जातील.
हा कार्यक्रम रेग्युलस सोसायटी, दसरा चौक, बालेवाडी.
बालेवाडी येथील सर्व माता भगिनींनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन बालेवाडी वेल्फेअर फेडरेशन आणि बाणेर बालेवाडी मेडिकोज असोसिएशन तर्फे करण्यात आले आहे.