नगरसेवक अमोल बालवडकर व दिशा फाऊंडेशनच्या वतीने १० वीच्या परीक्षार्थींना परीक्षा किटचे वाटप

0
slider_4552

सुसगाव :

सुसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे नगरसेवक अमोल बालवडकर व दिशा फाऊंडेशनच्या वतीने १० वीच्या परीक्षार्थींना परीक्षा किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना येणाऱ्या परीक्षेच्या कठीण काळामध्ये तणाव मुक्त राहून प्रसन्न मुद्रेने परीक्षेला सामोरे जाण्यास सांगितले. येणाऱ्या काळामध्ये आयुष्याला दिशा देणारी परीक्षा असून त्यास तुम्ही आत्मविश्‍वासाने सामोरे जाऊन यशस्वी व्हाल अशी खात्री व्यक्त केली. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

या परीक्षा किटमध्ये कंपास, परीक्षा पॅड, पाऊच व इतर साहित्याचा समावेश होता. यावेळी नगरसेवक अमोल बालवडकर आणि दिशा फाऊंडेशनचे युवा नेते अनिल ससार यांनी स्वतः उपस्थित राहून किट चे वाटप केले.

See also  म्हाळुंगे गावातील महिलांनी घेतला कोल्हापुर महालक्ष्मी दर्शन व ज्योतिबा दर्शन यात्रेचा लाभ