बालेवाडी :
बालेवाडी येथील एसकेपी कॅम्पस मध्ये एसकेपी क्रीडा महोत्सव अंतर्गत डॉ. सागर बालवडकर यांच्यावतीने हाउसिंग सोसायटी नाट्य स्पर्धा सोसायटीतील नागरिकांसाठी आयोजित केली आहे. या कॉम्पिटिशन चा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.




या उपक्रमाची माहिती देताना आयोजक डॉ. सागर बालवडकर यांनी सांगितले की, इंटर हाउसिंग सोसायटी ड्रामा कॉम्पिटिशन ( नाट्य स्पर्धा) च्या माध्यमातून बालेवाडी मधील सोसायटी मधील नाटकप्रेमी मित्र-मैत्रिणींना आम्ही हक्काचा रंगमंच उपलब्ध करून देत आहोत. ह्या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ झाला. SKP कला आणि क्रीडा महोत्सवामध्ये अशा विविध उपक्रमांची रेलचेल बालेवाडीकरांसाठी असेल जिथे त्यांच्या कला-गुणांना मुक्त वाव मिळेल. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्यने या उपक्रमात आपल्या सोसायटी बांधव आणि भगिनीसह सहभागी व्हावे आणि इतरांनाही प्रोत्साहन द्यावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क –
प्राची सिद्दिकी – 9823060859,
अंशूमाला सिंग – 8097910559,
सोनाली कुलकर्णी -9881208271









